भंडारा -इटखेडा बस सुरू;वाहक -चालकांचा सत्कार

0
18

आ.चंद्रिकापुरे यांचे ग्रामस्थानी मानले आभार

अर्जुनी मोरगाव,दि.12ः ग्रामीण भागातील जनतेची वाहिनी असलेली बहुप्रतिक्षित भंडारा ईटखेडा बस तीन वर्षानंतर सुरू केली. ज्येष्ठ नागरिक, महिला व जनतेने आनंद व्यक्त केला. बसवाहक, चालक, प्रवाशांचे सत्कार केला. बस सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे आ. मनोहर चंद्रीकापुरे यांचे सुद्धा आभार मानले.
भंडारा विभागाच्या रात्रपाळीत ईटखेडा मुक्कामी असलेल्या दोन बसफेऱ्या कोरोना नंतर तीन वर्षापासून त्या बंद करण्यात आल्या होत्या.त्यामुळे या मार्गावरील परिसरातील तसेच मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड झालेला होता. ईटखेडा सरपंच आशाताई इंद्रदास झिलपे यांनी आमदाराकडे बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगार प्रमुख सारिका लिमजे व विभागीय वाहतूक नियंत्रकाची पत्र देऊन चर्चा केली.भंडारा वरून सायंकाळी 5 वाजे निघणाऱ्या मासळ ,लाखांदूर पुयार मार्गे इटखेडा तसेच किटाडी, पालांदुर, दिघोरी, बोंडगाव देवी ,अर्जुनी मार्ग ईटखेडा या दोन्ही बस सुरू झाल्याने ही ईटखेडा परिसरातील व मार्गावरील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आमदार चंद्रिकापुरे यांचे अभिनंदन केले. बसवाहक भोयर ,नेवारे चालक आंबीलडुके, मनगटे यांचा गावकऱ्यांनी छत्रपती चौकात सत्कार केला. वाहक चालकांनी निवासाची व्यवस्था उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त केले.
कित्येक वर्षानंतर रात्र मुक्कामी बस सुरू झाल्याने ईटखेडाचे माजी सरपंच उद्धव मेहेंदळे, ग्रामपंचायत सदस्य छाया धांडे ,संजय कांबळी, रमेश कुंभरे , नारायण राऊत ,संजय मैंद, श्रीकांत ठाकरे, भागवत मेहंदळे, हरिदास प्रधान, ऋषिकेश गोठे, मोहित मेहंदळे ,दीपक दुपारे ,उमेश खोब्रागडे, मेघश्याम प्रधान, देवराम दुपारे, दिगंबर देशमुख , विजय मेहेंदळे,पांडुरंग गोठे,सेवक प्रधान व इतरांनी चालक- वाहक व प्रवाशांचे स्वागत करुन ज्येष्ठ नागरिक, महिला व इतरांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.