अर्थ सभापती संजय टेंभरे आज सादर करणार जि.प.चा अर्थसंकल्प

0
29

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज 13 मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती योपेंद्रसिह( संजय)टेंभरे हे आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.टेंभरे अर्थसंकल्पात काय नाविण्यपूर्ण योजनांचा पिटारा जिल्हा परिषद सदस्यांकरिता उघडतात याकडे लक्ष लागले आहे.तसेही गेली दोन वर्ष जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा प्रशासकीय अधिकारी यांनी सादर केला असून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाकडे त्यांनी लक्ष दिल्याचे दिसून आले नाही.मात्र यावे सभापती टेंभरे उत्पन्नवाढीसह काय करतात हे बघावे लागणार आहे.