सटवा येथे बैलांचा इनामी शंकरपट 20 मार्चपासून

0
32

* शंकरपटात तब्बल दोन लाखांच्या बक्षिसांचे होणार वितरण
गोरेगांव– तालुक्यातील सटवा येथे बैलांच्या इनामी शंकरपटाचे आयोजन प्राथमिक शाळेलगत भव्य पटांगणावर दिनांक 20 मार्च व 21मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सटवा येथील भव्य पटांगनावरील बैलांचा शंकरपट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 20 मार्च रोजी शंकरपटाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजयसिंह टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोरेगांव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जि. प. सदस्य जितेंद्र कटरे, उपसभापती राजकुमार यादव, पंचायत समिती सदस्य चित्रकला चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य केवल भाऊ बघेले, संतोष रहांगडाले, देवकांत ठाकूर, दुर्गाप्रसाद ठाकरे, भागचंद रहांगडाले, माजी सरपंच रमेश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सभापती मोरेश्वर कटरे आदी उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण 21मार्च रोजी माजी जिल्हा परिषद सभापती पी. जी. कटरे यांचे अध्यक्षतेखाली माजी सभापती झामसिंग बघेले, जगदीश येरोला, माजी सरपंच विनोद पारधी, बिपेंद्र ठाकूर, मुख्याध्यापक पी. बी. ठाकूर, उद्योजक सचिन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विजेत्या जोडीला प्रथम क्रमांकाचे 31 हजार रुपये, द्वितीय 25 हजार रुपये, तृतीय 16 हजार रुपयांचे यासह प्रत्येक क्रमांकपर्यंत विजेत्या बैल जोडीना बक्षीस देण्यात येणार आहे. शंकरपटात जास्तीत जास्त बैल जोडी मालकांनी सहभागी होऊन बैलजोडी स्पर्धेत आणण्याचे आवाहन आदर्श ग्राम शंकरपट समितीचे आयोजक अध्यक्ष महेश बघेले, जितेंद्र चौधरी, विनोद पारधी, ओमप्रकाश चौधरी, सचिव नितीन कटरे, चंद्रकांत ठाकूर, मयूर कोल्हे, चैनलाल राणे, नूतन बिसेन, लोकेश बघेले, ओंकार रहांगडाले आदींनी केले आहे.