दलितांवरिल वाढत्या अत्याचाराचे विरोधात निदर्शने

0
27

गोंदिया,-दलितांवरिल वाढ़त्या अत्याचाराचे विरोधात देशातील दलित व शेतमजुर विभागात कार्य करणा-या 5 प्रमुख संघटनाची संयुक्त समितीने दिलेल्या हाकेनुसार देशव्यापी आंदोलनातंर्गत “अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन”गोंदिया शाखा तर्फे आज एसडीओ कचेरी समोर तिव्र निषेध निदर्शने करूण भारताचे माननिय राष्ट्रपती यांचे नावे एसडीओ कार्यालयात 21 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यात दलित, आदिवासी , भटके व तत्सम निम्न जातीयांवर होत असलेले अत्याचार, एट्रोसिटी कायद्याची कड़क अमलबजावणी अनसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या होणा-या संस्थागत हत्यांच्या विरोधात कायदा करणे,खाजगीकरण क्षेत्रात आरक्षण, जातिगत जनगणणा ईत्यादि मुद्दयांचा समावेश होता. या निदर्शने आंदोलनात प्रामुख्याने, मिलिंद गनविर, रामचंद्र पाटील, करूणा गनविर, प्रल्हाद ऊके,सुरेश रंगारी चरणदास भावे, गुणवंत नाईक, क्रांती गणवीर, जितेंद्र गजभिए,एवन मेश्राम, गंगाराम भावे राजेंद्र गजभिए, अविनाश साऊसकार, हरीणखेड़े सह अनेकांचा शमावेश होता.