Home विदर्भ विना एकतेशिवाय नाभिक समाजाचा उद्धार नाही- राजकुमार प्रतापगडे

विना एकतेशिवाय नाभिक समाजाचा उद्धार नाही- राजकुमार प्रतापगडे

0

सडक अर्जुनी – नाभिक समाज हा अल्पसंख्यांक असून पंच्याहत्तर टक्के समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शासनाकडून इतर व्यवसायापेक्षा सतत दोन वर्षे अधिककाळ बंद सुरुमुळे पुन्हा नाभिक समाजाचा वाजवीपेक्षाही जास्तच आर्थिक नुकसान झाला आहे. परंतू , शासनाकडून आजपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. या सर्व बिंदूवर भविष्याचा विचार करुन शासनासी लढा देण्यासाठी सर्व भाषिक नाभिक समाजाने आपसातील मतभेद तथा पक्षभेद विसरुन एकतेची मूठ बांधल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच ०९ मार्चला सडक अर्जुनी तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने डुंडा येथे आयोजीत नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून सभापती संगीता खोब्रागडे, दीपप्रज्वलक जि. प. सदस्या सुधा रहांगडाले, पं. स. सदस्या निशा काशीवार, सरपंच उज्वला हटवार, प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष भुमेश मेश्राम, सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासूदेव भाकरे, उपाध्यक्ष चुळामन लांजेवार, किशोर कावळे, सचिव सुरेश चन्ने, सतिश साखरकर, जिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान सूर्यकार, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अनिता चन्ने, तालुकाध्यक्षा शारदा लांजेवार, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चन्ने, भाजपचे जिल्हा संघटक गोरेश बावनकर, ग्राम पंचायत सदस्या सुनिता चिंधालोरे, माधुरी ठलाल, ममता बावनकर, राजेंद्र बिसेन, गोंदिया तालुकाध्यक्ष हेमंत कौशल, उपाध्यक्ष प्रदिप लांजेवार, कैलाश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष चुन्नीलाल सूर्यवंशी, शहर अध्यक्ष दिनेश फुलबांधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी मुर्तीदाते पुरुषोत्तम सूर्यकार, पुजारी देवचंद मौदेकर, समाजरत्न विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक लांजेवार, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चन्ने, तेजलाल चन्ने आणि पोलिस कान्सटेबल हरिश्चंद्र शेंडे आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नूतन बारसागडे, संचालन जिल्हा उपाध्यक्ष अशोक उरकुडे आणि उपस्थित सर्वांचे आभार तालुका सचिव विकास कावळे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी गुड्डू मेश्राम, नरेश कावळे, अमोल मौदेकर, लंकेश उरकुडे, साईनाथ लांजेवार, जगदिश कालळे, सतोष लांजेवार, सुखदेव हटेले, विवेक उरकुडे, कृष्णा सूर्यवंशी, वामन सूर्यवंशी आणि सुनिल सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version