शिरपूर येथे श्वेतांबर आणि दिगंबर पंथात हाणामारी, गावात तणावाचे वातावरण

0
35

वाशीम : मालेगाव तालुक्यातील  शिरपूर जैन येथे श्वेतांबर आणि दिगंबर या दोन जैन पंथामध्ये १८ मार्च रोजी वाद उफाळून आल्याने हाणामारी झाली होती. हे प्रकरण पोलिसात जात नाही तोच आज १९ मार्च रोजी दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. गावात तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे वतीने शांततेचे आवाहन केले जात आहे.आज १९ मार्च रोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा श्वेतांबर आणि दिगंबर या जैन धर्मीय पंथीयांमध्ये हाणामारी झाली. श्वेतांबर पंथीयांनी रॅली काढली असता ही रॅली दिगंबर पंथीयांच्या मंदिरासमोरून जात असताना श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथीयामध्ये तुंबळ हाणामारी झाली. काल १८ मार्च रोजी दुपारी तीन ते चार वाजता च्या सुमारास मंदिर परिसरात दोन्ही पंथीयांमध्ये बॉन्सर ठेवल्याच्या कारणावरून हाणामारी झाली होती. याप्रकरणी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. तर आज दुपारनंतर श्वेतांबर पंथीय गटाने रॅली काढल्यानंतर दिगंबर आणि शेतांबर या दोन पंथीयांमध्ये जबर हाणामारी झाली. यामुळे शिरपूर जैन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.