Home विदर्भ आ.अग्रवालांच्या हस्ते हुतात्मा बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सभामंडपाचे...

आ.अग्रवालांच्या हस्ते हुतात्मा बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सभामंडपाचे लोकार्पण

0

गोंदिया,दि.22ः-गोंदिया विधानसभा क्षेत्रातील कारंजा येथे मोठ्या संख्ये मध्ये आदिवासी बांधव आहेत. व त्यांच्या द्वारे मोठ्या स्वरूपात क्रांतिकारक हुतात्मा बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची जयंती कार्यक्रम व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा सभामंडपाचे लोकार्पण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त आ.विनोद अग्रवाल हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुरुवातीला आ.विनोद अग्रवाल यांनी क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या सभामंडपाचे लोकार्पण केले व महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. या दरम्यान मंचावर उपस्थित झाले व समाजबांधवानी स्वागत गीत च्या माध्यमातून स्वागत केले.

कार्यक्रमप्रसंगी आ.विनोद अग्रवाल हे आदिवासी समाज बांधवाना संबोधित करतांना बोलले की,आदिवासी समाजबांधवानी रुढी परंपरेला जपावे असे बोलले जेणेकरून आदिवासी संस्कृतीला कायम ठेवता येईल. व कार्यक्रमामध्ये बोलविले त्याबद्दल सर्वं बाँधवाचा आभार व्यक्त केले. तसेच बोलले की मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे तसेच आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाकरीता आर्थिक मदद व रोजगाराकरीता शासनाने मदद करावी अशी मागणी राज्यशासनाकड़े केली आहे.आदिवासी समाजातील बांधवाना शबरी आवास योजनेच्या लाभ देण्यात यांवे जेणेकरून १०० टक्के बाँधवांचे पक्के घरे निर्माण होतील यासाठी राज्यशासनाकड़े मागणी केली होती त्या अनुषंगाने अर्थसंकल्पामध्ये १ लाख घरकुल चे प्रावधान करण्यात आले आहे. १०० टक्के बांधवाचे घरकुलाचे बांधकाम होणार व कोणताही आदिवासी बांधव वंचित लाभापासून वंचित राहणार नाही. व कारंजा मध्ये मोठ्या संख्येमध्ये आदिवासी बांधव आहेत त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावे या साठी मी मदद करणार व  वचन सुद्धा देत आहे. तसेच पिण्याचे पानीची योग्य सोय करण्यात येईल आदिवासी बांधव ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत त्यांना मुख्यमार्गाने जोड़ण्यासाठी ४००० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. असे आ.विनोद अग्रवाल यांनी माहिती देतांनी बोलले. या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, भाउराव उके अध्यक्ष जनता की पार्टी, मोहन गौतम जिलाध्यक्ष किसान आघाडी, दुर्गाप्रसाद कोकोडे, कचारगढ़ ट्रस्ट अध्यक्ष, उषाताई आत्राम गोंडवाना दर्शन संपादिका नोकचंद कापसे सरपंच कारंजा, विट्ठलराव हरडे उपसरपंच, डॉ.चनाप साहेब, मिताराम हरडे माजी उपसरपंच कारंजा, अरविंद हरडे ग्राम पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version