सटवा येथील बैलांच्या इनामी शंकरपटात धावल्या तब्बल 200 बैलजोड्या

0
25

* शंकरपटात तब्बल दोन लाखांच्या बक्षिसांचे झाले वितरण
गोरेगांव- तालुक्यातील सटवा येथे बैलांच्या इनामी शंकरपटाचे आयोजन प्राथमिक शाळेलगत भव्य पटांगणावर दिनांक 20 व 21 मार्च रोजी करण्यात आले होते. या शंकरपटात महाराष्ट्र व मध्यप्रदेशसहित 200 च्या जवळपास बैलजोड्या सहभागी झाल्याने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सटवा येथील भव्य पटांगनावरील बैलांचा शंकरपट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 20 मार्च रोजी शंकरपटाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ के.टी.कटरे संचालक खरेदी विक्री संस्था गोरेगाव, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे शेखर खोब्रागडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, पोलिस पाटील टीकाराम रहांगडाले, महादेव राणे, भोजराज बघेले, हिवराज ठाकूर, देवराज कोल्हे, प्रकाश रहांगडाले, इंद्रराज राऊत कन्हैयालाल कोल्हे, ओमप्रकाश चौधरी, गणेश बघेले सरपंच सिलेगाव, सुनील बिसेन चिचगाव आदी उपस्थित होते.
शंकरपटाचे बक्षीस वितरण 21 मार्च रोजी सायंकाळी गोरेगांव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सभापती पी. जी. कटरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरक विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केवलराम बघेले, माजी सरपंच विनोद पारधी, सामाजिक कार्यकर्ता भागचंद रहांगडाले, बिपेंद्र ठाकूर, नाईक पुरगाव, छोटेलाल पारधी डव्वा, सिलेगव सरपंच गणेश बघेले, पोलिस पाटील टीकाराम रहांगडाले, रवींद्र कटरे, भोजराज बघेले, रवींद्र रहांगडाले आदी उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे विजेत्या जोडीला 31 हजार रुपये द्वितीय 25 हजार रुपये, तृतीय 16 हजार रुपयांचे यासह प्रत्येक क्रमांकपर्यंत विजेत्या बैल जोडीना बक्षीस देण्यात देण्यात आले. शंकरपटात 180 बैल जोडी मालकांनी सहभागी घेतला. शंकरपट यशस्वीकरिता आदर्श ग्राम शंकरपट समितीचे आयोजक अध्यक्ष महेश बघेले, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष विनोद पारधी व ओमप्रकाश चौधरी, सचिव नितीन कटरे, चंद्रकांत ठाकूर, मयूर कोल्हे, चैनलाल राणे, लोकेश बघेले, ओंकार रहांगडाले, खेमेंद्र रहांगडाले यांच्यासह सर्व समिती सदस्यगण तथा गावातील समस्त नागरिक व युवकांनी परिश्रम घेतले.