सिरोंचा आढळला पांढरा दर्मिल एल्बिनो कोब्रा

0
20

सिरोंचा-निसर्गरम्य वातावरण असलेल्या सिरोंचा शहरात रविवार, १९ मार्च सिरोंचा एक राईस मिलच्या खोलीत एक साप दडुन बसल्याचे दिसून आले. याची माहिती सिरोंचा येथील सर्पमित्र नईम शेख यांना देण्यात आली. सर्प मित्र नईम शेख व त्याच्या सहकार्‍यांनी दडून बसलेल्या सापाला बाहेर काढले तेव्हा अतिशय शुभ्र अशा पांढर्‍या रंगाचा सापाचे दर्शन झाले.
विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. हा साप व्हाईट एल्बिनो या नावाने ओळखला जात असल्याची माहिती सर्पमित्र नईम शेख यांनी दिली. सापाची लांबी ४ फुट ९ सेमी असल्याचे सांगितले. या प्रजातीच्या सापाची वाढ कमी असते. मात्र, हा साप पूर्ण वाढलेला होता. त्वचेचा होणार्‍या अल्बिनझम या आजारामुळे त्वचा अगदी पांढरी शुभ्र होते. पांढर्‍या त्वचेमुळे साप एल्बिनो म्हणून ओळखला जातो. क्वचीतप्रसंगी सापामध्ये हा आजार दिसून येतो. गडचिरोली जिल्ह्यात कोब्रा प्रजातीचे साप मोठय़ा संख्येने आढळून येत असले तरी एल्बिनो कोब्राची ही पहिलीच नोंद आहे. सर्पमित्र नईम शेख व त्यांचे सहकार्‍यांनी सदर सापाला प्राकृतिक अधिवासात मुक्त करून त्याला जीवनदान दिले.