Home विदर्भ कृषी महोत्सवात आरोग्य विभागामार्फत जनजागृती

कृषी महोत्सवात आरोग्य विभागामार्फत जनजागृती

0

गोंदिया -जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 23 ते 27 मार्च 2023 कालावधीमध्ये मोदी मैदान, बालाघाट टी पॉईंट जवळ आयोजन केले आहे .जिल्ह्यातील सर्व विभागांनी आपले विविध कार्यक्रम व योजनांचे स्टॉल लावून जनजागृती करण्याचे आदेशित आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया व राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया यांच्या वतीने जनजागृती स्टॉल चे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे व जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी प्रशांत खरात यांच्या संकल्पनेतून  करण्यात आलेले आहे. जनजागृती स्टॉलच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक योजना व कार्यक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विषयक विविध आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपचार यांचे सुद्धा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. पुढील पाच दिवस चालणारा कृषी महोत्सवात आयुष ,योगा, मानसिक आजार, सिकलसेल व असासंर्गिक आजारा जसे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इ. तसेच सासंर्गिक ईन्फ्लुएंजा आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले आहे.
महोत्सवात आयुष विभागाचे डॉ. मीना वट्टी, राजेश चुटे, कमलेश चापने व असासंर्गिक कार्यक्रमाचे डॉ. स्नेहा वंजारी, डॉ. कांचन भोयर, नेत्ररोग विभागाचे भाविका बघेले,सिकलसेल विभागाचे सपना खंडाईत,मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे आगुलवार,कुष्ठरोग विभागाचे सुरेखा बोरकर, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे संजय बिसेन, आरोग्य विभागाचे महेश चुटे यांची उपस्थितीत मार्गदर्शन लाभणार आहे.

Exit mobile version