Home विदर्भ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य दिवस साजरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक मौखिक आरोग्य दिवस साजरा

0

गोंदिया, दि.23 :  स्वच्छ मुख अभियान मोहिमे अंतर्गत २० मार्च २०२३ रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिवस म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया मार्फेत साजरा करण्यात आला. सर्वप्रथम या अभियाना अंतर्गत मौखिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विभागातर्फे कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालया पासून गांधी प्रतिमापर्यंत जनजागृती फेरी (रॅली) काढण्यात आली.

        दंतशास्त्र विभागामधील डॉक्टरांच्या चमुने ग्रामपंचायत निलज जि. गोंदिया यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रुग्णांची मुख तपासणी केली. गावातील १७१ लहान मुले आणि इतर नागरिकांची मुख तपासणी व तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मौखीक आरोग्य शिक्षण, योग्य दात स्वच्छ (ब्रशिंग) करण्याची पध्दत व दिवसातून दोनदा ब्रश करण्याचे महत्व शिकविण्यात आले. याकरिता सहाय्यक प्राध्यापक डॉ. कविता मदान व कनिष्ठ निवासी डॉ. सचिन नाकाडे यानी योगदान दिले. सदर कार्यक्रमात वरील प्रमाणे लहान मुले व १२३ इतर रुग्णांची अशी गावातील एकूण २९४ रुग्णांची मुख तपासणी करण्यात आली.

         मुख आरोग्य तपासणीसोबत नेत्र, ब्रेस्ट कैंसर व महिलांचे आजारांची तपासणी :- जागतिक मौखिक आरोग्य दिवसांचे निमीत्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया कडून ग्रामपंचायत निलज जि. गोंदिया येथील नागरीकांची नेत्र तपासणी, महिलांच्या आजारांची तपासणी, ब्रेस्ट कँसरची तपासणी सुद्धा करण्यात आली. याकरीता महाविद्यालयातील डॉ. विजय कटरे, डॉ. धवल सावंत, डॉ. स्वप्नील रंगारी, डॉ. ललीत मेश्राम, डॉ. विकास कुमार व डॉ. कृपाल पारधी इत्यादींनी परिश्रम घेतले.

         डॉ. कुसूमाकर घोरपडे, अधिष्ठाता यांनी जागतिक मुख आरोग्य दिनानिमीत्य सर्व नागरीकांना आपल्या दातांची, हिरडयांची नियमीत स्वच्छता ठेवावी तसेच सर्व तरुणांनी तंबाखू, खर्रा इत्यादी पासून दुर रहावे, जेणेकरुन मुख आरोग्याबाबतच्या आजारांना बळी पडावे लागणार नाही असा संदेश दिला. नागरीकांनी दात काढून टाकणे हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवावा, त्याआधी दात वाचविण्याचे सर्व पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत असा मोलाचा सल्ला या अभियानातून दिला. सदर अभियान अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपड़े, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकिशोर जयस्वाल व विभागप्रमुख, दंतशास्त्र डॉ. प्रियतमा मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. तसेच सदर अभियान यशस्वी करण्यासाठी निलज ग्रामपंचायतचे सरपंच सोमेश्वर हरिनखेडे यांचे सहकार्य लाभले. दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागातील डॉ. विनीता यादव, डॉ. हरसीमरण भाटिया, डॉ. शिवानी हरिनखेडे व डॉ. स्नेहा भोयर यांचे मोलाचे योगदान लाभले.

error: Content is protected !!
Exit mobile version