जिल्हाधिकारी साहेब…सायकांळ होताच कृषी विभागाचे स्टॅाल होतात रिकामे

0
89

तालुका कृषी विभागातील अधिकार्यांची अनास्था,लाखो रुपयाचा खर्च वाया

नागरिकांना माहिती अभावीच परतण्याची वेळ

गोंदिया, दि.25 :जिल्ह्यात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 27 मार्च दरम्यान जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे आयोजन मोदी मैदान, टी पॉईंट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे करण्यात आलेले आहे.हे आयोजन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत निर्धारीत करण्यात आले असून या वेळेत त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सर्व स्टॅालवर सर्वांची उपस्थिती एकप्रकारे अनिवार्यच आहे.जिल्हा कृषी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांच्या व्यतिरिक्त कुठलाही अधिकारी या महोत्सवाला सायकांळच्यावेळी हजर असल्याचे चित्रही बघावयास मिळाले नाही.

मात्र महोत्सवाच्या दुसर्याच दिवशी 24 मार्च रोजी सायकांळी 7 वाजेच्या सुमारास या महोत्सवाला भेट दिल्यावर शासकीय विभागाचे अधिकारी वेळेआधी आपल्या स्टॅालवरील साहित्य गुंडाळून घरी रवाना झाल्याने स्टॅाल रिकामे असल्याचे चित्र बघावयास मिळाले.त्यातच जिल्हा परिषदेच्या इतर पदाधिकार्यांनाही या मेळाव्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.जेव्हा की महिला बालकल्याण,समाजकल्याणसह शिक्षण व आरोग्य अशा ग्रामीण भागाशी संबध असणार्या विभागांना सहभागी करुन घेत त्या विभागाच्या पदाधिकारी वर्गालाही सामावून घेतले गेले असते तर अजून या कृषी महोत्सवाला नागरिकांची गर्दी वाढू शकली असती.

कृषी विज्ञान केंद्र हिवरा,तालुका कृषी अधिकारी तिरोडा,तालुका कृषी अधिकारी गोरेगाव,उपविभागीय कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव,तालुका कृषी अधिकारी आमगाव सह कृषी विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या एकाही स्टालवर एक सुध्दा कर्मचारी सायकांळी 7 ते 8 वाजेदरम्यान हजर नव्हता.त्यामुळे रात्रीच्यावेळी या कृषी महोत्सवाला भेट द्यायला आलेल्या नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॅाल रिकामे असल्याने माहिती न घेता परतावे लागले.लाखो रुपये खर्च करुन हे आयोजन करण्यात आले.मात्र कृषी,महिला बालविकास व माविमच्या अधिकार्यांनाच सायकांळी या कार्यक्रमातील माहितीच्या स्टॅालवर राहायचे नसेल तर सायकांळची वेळ कार्यक्रमाची ठेवण्यातच का आली असे प्रश्नही आलेल्या नागरिकांनी उपस्थित करीत जिल्हाधिकारी महोदयांना याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना गोंदिया जिल्ह्यामध्ये सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन आज 25 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मोदी मैदान, टी पॉईंट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेले आहे.