Home विदर्भ माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश:५ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत...

माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश:५ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश जारी

0
file photo

भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत.या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे पाच ब्रास वाळू मोफत देण्याची विनंती केली होती.

माजी पालकमंत्री श्री. फुके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत महसूलमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर निर्णय घेऊन लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. या आदेशावर भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 26 मार्चला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यानां आदेश पत्र निगर्मित करून आवास योजना चे सर्व लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचे आदेश तत्काल प्रभावाने दिले.

डॉ.परिणय फुके यांच्या या प्रयत्नांमुळे आता गरजू घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळणार असून त्यामुळे त्यांचे अडथळे दूर होऊन त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. याबद्दल डॉ.फुके यांचे सर्व लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version