कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
20

गोंदिया, दि.28 : कृषी विभागाच्या शेतकरी कल्याणाच्या विविध योजना उत्कृष्टपणे राबविणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कृषी महोत्सवात सत्कार करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मार्च ते 27 मार्च दरम्यान गोंदिया जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर उपस्थित होते.

       शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यात अधिकारी-कर्मचारी यांची भूमिका महत्वाची असून सामान्यातील सामान्य माणसापर्यंत योजनांचा लाभ मिळावा म्हणून काम करणे आपले कर्तव्यच आहे. हे काम करतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम केल्यास शासनाचा उद्देश सफल होईल असे मत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.

        सत्कार करण्यात आलेल्यात नोडल अधिकारी (स्मार्ट) प्रणाली चव्हाण, पुरवठा व मूल्यांकन साखळी तज्ञ कावेरी साळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुषमा शिवणकर, अर्थ सल्लागार (स्मार्ट) सचिन कुंभार, कृषी अधिकारी पवन मेश्राम, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अरविंद उपवंशी, लेखापाल विशाल बडमेरा, पवन भोसले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सुनील खडसे, विलास कोहडे, शिवकुमार पुस्तोडे, यासिन नजीर शेख, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गजानन पटले, शैलेश बिसेन, गुलचंद मस्के, घनश्याम चव्हाण, जिल्हा सल्लागार भारत गोंडाणे, नूतन कटरे, भावेश दमाये, रिजवान शेख, पुस्तकला खैरे, कुंजलता भुरकुडे, कामेश भोरणारे, संजय ठाकरे, मुनेश्वर कोसमे, रमेश कोराम, भौदीप शहारे, ओकेश न्हाने, रजत शेंडे, वर्षा हाडगे, दीपक डहाळे, पी.व्ही. कलेवार, जे.टी. मेंढे, एल.एम. रिनाईत, एस.व्ही. दांडगे, नमिता यादव, राधेश्याम लोहबरे, प्रमोद खोटेले, भारत डोंगरवार, राहुल हिवाळे, दीपा पारधी व व्ही.एस. बिसेन यांचा समावेश आहे.