थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

0
58

थकीत वीजबिल भरा,सहकार्य करा

गोंदिया -महावितरणच्या गोंदिया परिमंडळा अंतर्गत येत असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतिल तब्बल 42,410ग्राहकांकडील थकबाकीची रक्कम 4 कोटी 8 लाख रु. इतकी असून या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई  करण्याचे सक्त निर्देश महावितरण ने संबंधिताना दिले आहेत॰

वीजबिलांची थकबाकी असणार्‍यांच्या वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरण कडून करण्यात येत आहे॰ थकबाकीदारांचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले.त्यानुसार वीजबिल वसूली व थकबाकीदारांच्या विरुद्ध कारवाईला वेग आला आहे. गोंदिया परिमंडळात आतापर्यंत 4 हजार 273 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तेव्हा, पुढील कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी त्वरित वीजबिल भरावे असे आवाहन महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

 गोंदिया परिमंडळएकूण थकबाकी 

वर्गवारी एकूणग्राहकसंख्या एकूण थकबाकी
घरगुती 39055 2कोटी67लाख
वाणिज्यिक 2667 85 लाख
औद्योगिक  688 49 लाख

वीज ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीज देयक छापील दिनांकापासून 7 दिवसाचे आत भरणा करून वीज देयकाच्या रकमेत 1% सवलतीचा लाभ घ्यावा.तसेच डिजिटल पेमेंट द्वारे भरणा करून 0.25% ते 500 रुपयापर्यंत सवलतीचा लाभ घ्यावा.तसेच गो- ग्रीन सुविधेचा लाभ घेऊन ऑनलाइन  भरणा केल्यास प्रती देयक 10 रु. लाभ देण्यात येतो. सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीज बिल त्वरित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे व पुढील कटू कारवाई टाळावी.30 मार्च 23 ला श्रीरामनवमीची सुट्टी असली तरी मार्च अखेर असल्यामुळे सर्व रोख संकलन केंद्र सुरू राहतील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.