गोंदिया-भंडारा जिल्हयातील पयर्टन क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी

0
19

खा.प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने पयर्टन विकासाला चालना

गोंदिया-राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य
शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या संदर्भात माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी खा.प्रफुल पटेल यांचे कडे सतत पाठपुरावा केला होता.

गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हायाच्या सर्वांगिण विकास घडवुन यावा यासाठी खा.पटेल हे योग्य नियोजन करून सतत प्रयत्नरत राहतात. त्यातच क्षेत्रातील नागरिकांची भौतिक सुविधा आणि पयर्टन, तिर्थक्षेत्र स्थळाच्या पायाभुत सुविधा अधिक सुव्यवस्थीत व्हावा यासाठी देखील त्यांचे प्रयत्न राहते. या अंतर्गत गोंदिया जिल्हयातील नागरा व प्रतापगढ तर भंडारा जिल्हयातील प्रसिध्द् तिर्थक्षेत्र स्थळ चांदपुर या तिन्ही ठिकाणी पयर्टनाला वाव मिळावे या उद्देश्याने माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले. या संदर्भात खा.पटेल यांनी राज्य शासनाशी सतत पाठपुरावा केले. परिणामी राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने 31 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून गोंदिया -भंडारा जिल्हयातील पयर्टन विकासासाठी प्रत्येकी 1 कोटीच्या निधीचा कामांना मंजुर प्रदान केलेली आहे. मंजुर कामांना साठी प्रत्येकी 25 लक्ष रुपयाचा निधी ही जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आलेली आहे. यामुळे लवकरच तिन्ही तिर्थक्षेत्रात पयर्टन विकासाचे कामांना सुरुवात होणार आहे.

खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने व माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या प्रयत्नाने तिर्थक्षेत्राच्या विकास कामांना चालना मिळणार आहे. याबद्दल जिल्हयातील भाविकांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.