Home विदर्भ शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार:-आ. कोरोटे

शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार:-आ. कोरोटे

0

# आडनाव म्हणजे मार्का नाही,विरोधकांवर बरसले मानकर
#परिवर्तन पैनलचा स्नेहमीलन सत्कार कार्यक्रम
आमगाव:- नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत किसान विकास परिवर्तन पैनलने राष्ट्रवादी व भाजपच्या युतीला आवाहन देत क्षमतेने मताधिक्य घेऊन चार संचालकांचे विजयश्री खेचून आणले,याच संचालकांचे सत्कार व स्नेह मिलन कार्यक्रम स्थानिक जमीदार राजवाडा पैलेश येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या आद्यक्षस्थानी आमदार सहसराम कोरोटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवकराम ब्राह्मणकर,यशवंत मानकर,बंशिधर अग्रवाल ,संजय बहेकार यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी आ.सहसराम कोरोटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हा मुख्य घटक आहे.परंतु त्याला मिळणाऱ्या सुविधा पासून वंचित व्हावे लागत आहे.नगर परिषद परिक्षेत्रात तर विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींचे विकास कामे सुरू केली आहेत,शेतकऱ्यांना सिंचनासाठी कुवाढास प्रमाणे विविध बंधारे निर्माण करण्यासाठी माझे प्रस्ताव मंजुरी करिता प्रास्तावित आहेत.शेतकरी सिंचनापासून वंचित राहू नये तर विविध प्रकारचे पीक फलबागे,बाजी उत्पादनावर भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे यात नक्की लवकर कार्य होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, याचे सर्वेक्षण व मदत शासनाने करावी यासाठी मंत्रालय गाठणार असे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक यशवंत मानकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी पातळी सोडून केलेल्या आरोपांचे समाचार घेतला तर जोरदार टीका केली, विरोधकांची मतांची गणिताची गोळाबेरीज चुकली असे बोलून क्षमतेपेक्षा अधिक मते घेऊन संचालक निवडणूनच आणले नाही तर विरोधकांना आत्मचिंतन करावे अशी समज दिला आहे, ज्यांनी कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केली त्यांच्या सोबत युती म्हणजे अभद्र व्यवहार घडलंय,यात राष्ट्रवादी काँग्रेसने युतीधर्म पाळला नाही व मते फिरवली यामुळे अनेक दिग्गजांनी शेवटचा टप्पा गाठला व निसटता विजय मिळवला. यावेळी त्यांनी विरोधात टाकलेल्या आरोपाबद्दल जोरदार प्रतिउत्तर दिले मानकर हा आडनाव कंपनीचा मार्कां नाही तर पूर्वजांच्यामुळे मिळालेला सन्मान आहे,यात ज्यांनी चांगले कर्म केले त्यांची ओळख यशवंत मानकर म्हणून झाल्याचे सांगत एकनिष्ठपणे ज्यांच्यासाठी कार्य केले ते वैरी झाले.कुटुंबातील वेक्तीसाठी मदत मागितली तर भाकरी फिरवली गेली मग कुटूंबाची ही पिळवणूकच आहे.गरज असली तर वापरून घ्यायचं तर गरज संपल्यावर फेकून द्यायचे हे कधी थांबणार ?,गुरुजनांचे मार्गदर्शन व जनतेचे आशीर्वादाने सेवेचे कार्य सुरूच राहणार ,आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कुणाच्या धमकीला घाबरत नसून कुणी हल्ला करण्याचा विचार करू नये,महाराजानी अफजलखानाचा कोथळा काढला होता हे विसरू नये असे बोलून त्यांनी विरोधकांवर चांगलाच समाचार घेतला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य छाबुताई उके,विद्यासागर पारधी, नवनिर्वाचित संचालक हुकूम बोहरे, संजय बहेकार,महेश उके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक भुपेश अग्रवाल ,संजय बहेकार,हुकूम बोहरे,महेश उके यांचे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात अजय गहरवार, उमादेवी बिसेन, अरुणा बहेकार,धनिराम मटाले,बलदेव चौधरी, बेनिराम पाथोडे,बाबूजी मेंढे,अजय खेताण,उज्वल ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे,यांनी तर आभार नरेश बोपचे यांनी केले .यावेळी कार्यक्रमात रामेश्वर श्यामकुवर, पिंकेश शेंडे,संजय डोये, प्रमेश कांबळे,दिगंबर कोरे,बोरकर,उमेन्द्र बोपचे, डॉ.तुरकर ,राधाकिसन चुटे सह विविध ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य,सेवा सहकारी संस्था चे अद्यक्ष,उपाध्यक्ष संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version