दवडीपार येथे मग्रारोहयोतून सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन

0
27

गोरेगाव,दि.११- तालुक्यातील ग्राम पंचायत दवडीपार येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 4 सिमेंट रस्ता व नळयोजना बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.सदर सिमेंट रस्ते राममंदिर ते किशोर धनलाल कटरेच्या घरापर्यंत,मारोती मोटघरेच्या घरापासून ते वामन चामलाटेच्या घरापर्यंत,सुशील उपाध्यायच्या घरापासून ते भोजराज कटरे गुरुजीच्या घरापर्यंत,नीलकंठ कोल्हटकरच्या घरापासून ते योगेद्र कटरेच्या घरापर्यंत तयार करण्यात येणार आहेत. सोबतच नव प्रतिभा हायस्कूल येथे नळ योजनेचे भुमीपुजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे,पं.स.सदस्य किशोर पारधी,सरपंच बि.एम.कटरे,डॉ.साहेबलाल कटरे,उपसरपंच साहेबलाल बिसेन, ग्रामपंचायत सदस्य कुवरलाल कटरे,सौ.सुनिताबाई बिसेन,सौ.दिपकलाबाई पटले,सौ.सुषमाताई डोंगरे,सौ.सुनिताबाई कटरे,नव प्रतिभा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शरणागत,लुकेश पटले,एच.एस.पारधी,होमेश्वर कटरे तसेच मान्यवर उपस्थित होते.