Home विदर्भ राष्ट्रसंताच्या राष्ट्रनिर्मितीचे कार्य सुसंस्कार शिबिरातून घडविणार-गणेश बोदडे

राष्ट्रसंताच्या राष्ट्रनिर्मितीचे कार्य सुसंस्कार शिबिरातून घडविणार-गणेश बोदडे

0

बोरी येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

अर्जुनी मोरगाव,दि.13ः आजच्या संगणकीय युगात नीती मूल्यांचा ऱ्हास होत असून नीट हाताळता न येणाऱ्या मुलांच्या हातात मोबाईल दिसते. आज सर्वत्र वातावरणाच्या प्रदूषणासोबत सुसंस्काराची वाणवा दिसते .नव्याने पुन्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रसंताच्या राष्ट्र निर्मितीचे कार्य सुसंस्कार शिबिरातून करणार असल्याचे प्रतिपादन गणेश बोदडे गुरुजी यांनी केले.
राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडी गुरुकुंज आश्रम मोझरी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यस्मरण व संस्कार मूर्ती आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी सावरी येथे करण्यात आले.उद्घाटकीय समारंभाला शिबिर प्रमुख गणेश बोदडे,व्यायाम शिक्षक अक्षय देशमुख,संगीत शिक्षक मंदार देशमुख,लाठीकाठी शिक्षक सौरभ कोल्हे ,मल्लखांब शिक्षक मोहन सोनटक्के,सहाय्यक शिक्षक शुभम, बोरीचे सरपंच मधुकर ठाकरे, शिबिर व्यवस्थापक दुर्योधन मैद, भूपेंद्र चौहाण, हिरालाल घोरमोडे,नानांनी घोरमळे, मुरलीधर ठाकरे व परिसरातील पालक व शिबिरार्थी मुले मुली उपस्थित होते.
गणेश बोदडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की ,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व आचार्य हरिभाऊ वेरूळ गुरुजी यांचे प्रेरणातून बोरी सावरी येथे निवासी शिबिराचे आयोजन केले आहे सतत दहा वर्षापासून शिबिराचे उत्तम प्रकारे आयोजन होत आहे .यावर्षी शिबिरामध्ये 52 विद्यार्थी व विद्यार्थिनी असून त्यांना शारीरिक मानसिक परिश्रम, व्यायाम, ,शिस्त ,योग प्राणायाम ,संगीत ,लाठीकाठी, मल्लखांब व इतर शिक्षण निवासी शिबिरातून देऊन मुलांच्या भविष्याच्या शिदोरीचे गाठोळे बांधून दिला जाते. दरवर्षी राज्यात हजारो विद्यार्थी घडविले जाते. स्थानिक ग्रामस्थांचे खूप मोठे सहकार्य नेहमीच मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दुर्योधन मैंद यावेळी म्हणाले की, बालमनावर घडणारे संस्कार हे कायमस्वरूपी कोरल्या जाते .उन्हाळी शिबिरामध्ये यातून शालाबाह्य शिक्षण देण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समिती करीत आहे. मागील दहा वर्षापासून तालुक्यात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन होत असते व कायमस्वरूपी बोरी येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन केल्या जाते .मानवी मनाचे नैसर्गिक मूल्य बालकावर चीरस्थानी कोरण्याचे कार्य या शिबिरातून होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता बोरी सावरी येथील ग्रामस्थ सहकारी करीत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान यावेळी त्यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!
Exit mobile version