Home विदर्भ गोरेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

गोरेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

0

गोरेगाव –गोरेगाव तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा विभाग मार्फत जल जीवन मिशनची कामे सुरु करण्यात आली.मात्र कंत्राटदार व अभियंते ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम करीत असल्याने देयके देतांना ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राशिवाय देयके देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.ग्रामपंचायत स्तरावरील कुशल- अकुशल कामांना मंजुरी देऊन गांवात रोजगार उपलब्ध करून दयावे,अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे.तलाठी सांझ्यामधे कोतवालाची रिक्त पदे मागील पाच वर्षांपासून असून ते सुध्दा भरण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तालुका सरपंच -उपसरपच संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे ,अति.मुख्यकार्यकारी अधिकारी शितल पुंड,कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे,गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, तहसीलदार गोरेगाव,गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना देण्यात आले.
यावेळी तालुका सरपंच -उपसरपच संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे सरपंच मोहाडी, उपाध्यक्ष विजय बिसेन सरंपच हिरापुर, सचिव अरूण बिसेन सरंपच झांजिया,जिल्हा महिला प्रमुख-वर्षाताई पटले सरंपच लिंबा, तालुका महिला प्रमुख भुमेश्वरी रांहागडाले सरंपच चिंचगांव,पालेवाडा सरंपच मोनिका डाहरे,सोनी सरंपच हेमेश्वरीताई हरिणखेडे,तुमखेडा सरंपच रंजुकुमार येळे, मोहगाव सरपंच सुरजलाल पटले,संघटन प्रमुख यशवंत कावडे, उपसरपंच झनकलाल चौव्हाण, ओमकार कटरे, सरपंच अतुल मोटघरे,शेषकुमार रांहागडाले, सरपंच महेश चौधरी आदी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Exit mobile version