Home विदर्भ बाम्पेवाडा व वलमाझरीमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची तपासणी

बाम्पेवाडा व वलमाझरीमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची तपासणी

0

·         विभागस्तरीय चमुने केली विविध योजनांच्या कामाची पाहाणी

·         ग्रा. पं. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

भंडारा, दि. 19 मे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतंर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची विभागस्तरीय तपासणी 18 मे रोजी साकोली पंचायत समिती अंतर्गत ग्राम  पंचायत  बाम्पेवाडा व  खैरी वलमाझरी येथे पार पडली. विभागस्तरीय चमुने दोन्ही गावात विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांकरीता राबविण्यात येत असलेल्या योजनांची पहाणी केली. यावेळी चमुने ग्राम पंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतंर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी राज्यात होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध योजनांद्वारे विकास कामे, नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. वैयक्तिक व सार्वजनिकस्तरीय उपाययोजना उभारून गाव स्वच्छ व सुंदर करण्यावर भर दिला जात आहे. सन 2020-21 व 2021-22 या दोन्ही वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा एकत्र घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व प्रकल्प संचालक (जिग्रावियं) विवेक बोंदरे यांचे मार्गदर्शनात सातही पंचायत समितीस्तरावर‍ स्पर्धा पार पडल्या.

जिल्ह्यात प्रथम व द्वितीय येण्याचा मान साकोली पंचायत समितीने मिळविला. त्यामध्ये ग्राम पंचायत बाम्पेवाडा प्रथम तर खैरी वलमाझरी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. जिल्ह्यातील दोन्ही ग्राम पंचायतींची विभागस्तरीय तपासणी काल गुरूवारी पार पडली. विभागस्तरीय चमूमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून उपायुक्त (आस्था) मा. विवेक इल्मे, उपायुक्त (विकास) कमलकिशोर फुटाने, उपविभागीय अभियंता (मजिप्रा) अजय बेले, विस्तार अधिकारी श्री पटले आदींचा समावेश होता.

यावेळी चमुने बाम्पेवाडा ग्रा. पं. कार्यालयात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) अरूण गिऱ्हीपुंजे, गट विकास अधिकारी ‍खिलेंद्र टेंभरे, सरपंच नंदेशीनी मेश्राम, जि. प. सदस्या माहेश्वरी नेवारे, पं.स.सभापती गणेशजी आदे, पं.स. सदस्य ललीत हेमने, सचिव शिवा हातझाडे, उपसरपंच नितीन चांदेवार, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, राजेश येरणे, पंचायत समितीचे निरंजण गणवीर, जनार्धन डोरले तर खैरी वलमाझरी येथील सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरस्कोल्हे, ग्रामसेवक नरेंद्र शिवणकर, ग्राम पंचायत पदाधिकारी, बचतगट, विविध समित्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बाम्पेवाडा येथीन सचिव हातझाडे तर खैरी वलमाझरी येथील सचिव नरेंद्र शिवणकर, सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे यांच्याकडून तपासणी समितीला ग्राम पंचायत संबंधीत विविध योजना, घरकुल, मनरेगा अंतर्गत उपलब्ध रोजगार ,ओडिएफ प्लस अंतर्गत निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांची माहिती देण्यात आली.

मुख्याध्यापक यांच्याकडून शाळा, विद्यार्थी गुणवत्ता, शाळेतील स्वच्छता सुविधा, पिण्याचे पाणी व्यवस्था, स्कॉलरशीप परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, नवोदय विद्यालयाकरीता निवड झालेले विद्यार्थींबाबत चर्चात्मक माहिती घेण्यात आली. अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधून विद्यार्थी संख्या, स्वच्छता सुविधा, बेबी टायलेट सुविधा, पिण्याचे पाणी, पोषण आहार बाबत माहिती जाणून घेण्यात आली. बचतगट महिलांशी गावस्तरावर महिलांना निर्माण झालेल्या उद्योग, खेळते भांगभांडवलाचा लाभ तसेच नळ पाणी पुरवठा योजना, पाणी शुध्दीकरण, जलसुरक्षक व महिलांच्या सहायाने पाणी गुणवत्ता राखणे, घनकचरा कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, वॉटर मिटर,बॉयोगॅस व नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन प्रत्यक्षात स्थळांना भेट देऊन पहाणी करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version