Home विदर्भ गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार काजळेश्वर येथे लोकसहभागातून कामाचा शुभारंभ  

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार काजळेश्वर येथे लोकसहभागातून कामाचा शुभारंभ  

0
जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती 
वाशिम दि.१९ –तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी आणि तलावातील सुपीक गाळ काढून शेतात टाकून जमिनीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार अभियान शासनाने सुरू केले आहे.या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात आज १९ मे रोजी कारंजा तालुक्यातील काजळेश्वरजवळील तलाव परिसरात लोकसहभागातून करण्यात आला.
         या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,तहसीलदार कुणाल झालटे, काजळेश्वरचे सरपंच नितीन उपाध्ये, उपसरपंच श्री.तौसीमोद्दीन,जानोरीचे सरपंच अमोल भिंगारे,ए.टी.उपाध्ये, विनोद उपाध्ये,सुभाष उपाध्ये,गजानन भड,नईम शेख,मंडळ अधिकारी जी.बी.मनवर,तलाठी संजय आडे, कृषी सहायक अनिल राठोड, ग्रामसेवक सतीश वरघट व अभियंता श्री.पेरवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
      विशेष म्हणजे काजळेश्वर तलावातील गाळ शेतकरी स्वयंस्फूर्तीने घेऊन जात आहे. शेतकरी लोकवर्गणीतून गाळ काढण्यासाठी जेसीबीचा वापर करत आहे.हे शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरने शेतात गाळ टाकत आहे.तलावातील गाळाचे महत्व शेतकरी जाणून असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी स्वखर्चाने तलावातील गाळ शेतात नेऊन पसरवीत आहे.त्यामुळे तलावातील गाळ शेतात टाकल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.तलावातील गाळ काढल्याने तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास या अभियानाचा हातभार लागणार आहे.या कार्यक्रमाला काजळेश्वर,जानोरी तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Exit mobile version