होफ हाँस्पिटलच्या पुढाकाराने ककोडीत आरोग्य शिबिर उत्साहात

0
26
वाढदिवसाच्या शुभेच्छा

विनोद सुरसावंत/ककोडी,दि.21-ःयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोठ्या गंभीर आरोग्याच्या सोयी रुग्णांना मिळाव्यात याकरीता नागपूर येथील होफ रुग्णालयाच्यावतीने निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामिण भागातील व्यक्तीला हृदयविकार,कर्करोग,हड्डीरोग,मुत्राशय,मस्तीक ट्यूमर सारख्या रोगांवर औषधोपचार आणि सर्जरीकरीता मोठी रक्कम मोजावी लागते. कधी कधी ते शक्य नसल्यास जिव गमवण्याची वेळ सुध्दा येते.अश्या आवश्यक रूग्णांना नागपुर येथील होप हाँस्पिटलच्या पुढाकाराने आँपरेशन आणि उपचारासाठी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात १५० रुग्णांना औषधोपचार करण्यात आला.काही रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपुरात होप हाँस्पिटल जावे लागणार आहे.त्याना स्वतःचा आधार कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड किंवा महात्मा जोतिराव फुले हे कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.होप हाँस्पिटलचे डॉ.सचिन गाठिबांधे,डॉ.सुरज गुप्ता,श्रीकांत भालेराव,समन्वय श़शांक उपगडे,व्यवस्थापक सुरज राजपुत,नर्स सिमरन कोकाटे, कु० रुपाली यांनी शिबिराला उपस्थित राहून सहकार्य केले.ककोडी प्रा.आ.केन्द्र आरोग्य अधिकारी डाँ.नंदिनी रामटेककर तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी आणि नर्स स्टाँफ यांनीही सहकार्य केले .