Home विदर्भ संबोधी बौद्ध विहारला’ ध्वनीक्षेपण संच’ भेट

संबोधी बौद्ध विहारला’ ध्वनीक्षेपण संच’ भेट

0

सडक अर्जुनी.-येथील संबोधी बौद्ध विहारला सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार आर.व्ही.मेश्राम व सेवा निवृत्त शिक्षिका प्रज्ञा मेश्राम या दाम्पत्यांकडून स्मृतीशेष ‘ नीलकमल ‘ च्या स्मृती प्रीत्यर्थ ध्वनीक्षेपण संच ‘ रविवारी (ता.२१) दान स्वरूपात भेट देण्यात आला.

सर्वप्रथम बौद्ध विहारात पूजन करून सामूहीक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्षा
तथा नगरसेविका शशिकला टेंभूर्णे, नगरसेविका दीक्षा भगत, नगरसेवक अश्लेष अंबादे, पत्रकार प्रा.डॉ. राजकुमार भगत, पत्रकार डॉ. सुशिल लाडे यांच्या हस्ते ध्वनीक्षेपण संच भेट देण्यात आला.यावेळी समाज कल्याण बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष विदेश टेंभूर्णे, उपाध्यक्षा रंजीता मेश्राम,कोषाध्यक्ष रूपचंद खोब्रागडे व संस्थेचे सदस्य यांनी ध्वनीक्षेपण संच स्वीकारला.याप्रसंगी दानदाते आर.व्ही.मेश्राम व प्रज्ञा मेश्राम तसेच प्रा.संतोष रामटेके, प्रा. दिवाकर कांबळे, चंद्रकांता मेश्राम, गिता खोब्रागडे, शिला सूर्यवंशी, मनिषा शाहारे, मंगला मेश्राम, चंद्रकांत गणवीर, रजनीश मेश्राम, पुण्यशिल कोटांगले, राहूल गणवीर, परसराम सूर्यवंशी, राकेश शहारे,नयनकुमार बडोले, गजानन गजभिये, अजय शाहारे,सावन शाहारे आदी उपस्थित होते. यावेळी संबोधी बौद्ध समाज कल्याण बहु उद्देशिय संस्थेचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी दानदाते सेवानिवृत्त शिक्षक आर.व्ही.मेश्राम व सेवानिवृत्त शिक्षिका प्रज्ञा मेश्राम यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
प्रा.संतोष रामटेके यांनी संचालन करून आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version