Home विदर्भ वन अधिकारी बाहेर बसून…तर कार्यालयातील केबीनमध्ये चौकशी कुणाची?

वन अधिकारी बाहेर बसून…तर कार्यालयातील केबीनमध्ये चौकशी कुणाची?

0

गोंदिया,दि.24-  जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालयातंर्गत येत असलेल्या रेंगेपार दल्ली येथील जंगलपरिसरात चांगल्या व सुस्थितीत असलेल्या सुमारे 54 सागाची झाडे जानेवारी ते फेबुवारी महिन्यात कापण्यात आल्याचे प्रकरण हे वनविभाग कितीही आम्हीच नियमाने कापल्याचे सांगत असले तरी या प्रकरणात नक्कीच कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण झालेली आहे.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनअधिकारी हे ज्या पध्दतीने पत्रकारांना या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत,त्यावरुन हे प्रकरण दिसतं तसं नाही असे स्पष्ट झाले.त्यातच पुन्हा या प्रकरणाची सत्यता आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील ससेकरण पहाडीजवळील वनविभागाच्या जागेवर गेल्या आठ महिन्यापासून अग्रवाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्यावतीने करण्यात येत असलेल्य गट्टू बांधकामाच्या जागेवर अचानक वनविभागाने घातलेल्या धाडप्रकरणी माहिती जाणून घेण्याकरीता पत्रकांरानी वनविभागाचे कोहमारा कार्यालय गाठले.कार्यालय गाठल्यावर जेव्हा वनअधिकारी जाधव यांची भेट घेण्याकरीता कार्यालयात पत्रकार जात असतानाच त्यांना आतमधील केबीनमध्ये चौकशी सुरु आहे.तुम्हाला जाता येत नाही असे सांगून बाहेरच थांबवण्यात आले.त्याचवेळी वनअधिकारी हे जाधव मात्र कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेत काही निवडक वनअधिकारी यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते.जर जाधव हे बाहेर गप्पा मारत बसले असतांना त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला पत्रकारांना थांबवण्याची गरज का पडली.वनअधिकारी जाधव हे जर कार्यालयाच्या बाहेर बसले असतांना आतमधल्या त्यांच्याकेबीन मध्ये कुणाची चौकशी सुरु होती असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.यानंतरही वनअधिकारी जाधव मात्र पत्रकारांशी बोलणे टाळून मी आज खुप व्यस्त आहे,अशी नेहमीची टेप वाजवित कार्यालयात आत मध्ये जाऊन बसले.मात्र ज्याठिकाणी चौकशी सुरु होती,त्या केबीनमध्ये मात्र ते का गेले नाही हा सुध्दा प्रश्न उपस्थित झाला असून जाधव याप्रकरणात वास्तविकता प्रसारमाध्यमांशी लपवत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सदर प्रकरणात वनअधिकारी जाधव हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यास कार्यालयात गेल्यावरही का टाळाटाळ करतात,नेहमीच चौकशी व व्यस्त असल्याचे कारण का सांगतात अशी विचारणा सहा.वनसंरक्षक प्रदिप पाटील यांना विचारणा केल्यावर त्यांनीही चौकशी सुरु आहे,चौकशीनंतर बोलतील असे बोलून त्यांनीही जाधव यांच्याकडून सुरु असलेल्या टोलवाटोलवीला समर्थनच केल्याचे दिसून आले.

ही बातमी पण वाचा– वनविभागाने कापली दल्लीच्या जंगलातून 54 सागाची झाडे,होतेय चौकशीची मागणी https://www.berartimes.com/vidarbha/172609/ via @berartimes

Exit mobile version