Home विदर्भ स्त्री शक्ती समाधान शिबिरात 130 अर्ज प्राप्त

स्त्री शक्ती समाधान शिबिरात 130 अर्ज प्राप्त

0

गोंदिया, दि.25 :- महिलांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक विविध शासकीय विभागांशी संबंधीत समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे दिनांक 9 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार 24 मे 2023 रोजी पंचायत समिती गोंदिया सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजन समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार मानसी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

          सदर शिबिरात तालुक्यातील जवळपास 152 महिला उपस्थित होत्या. 130 महिलांचे तक्रार व समस्या समाधान अर्ज प्राप्त झाले व सर्व अर्जांचे शिबिरातच निराकरण करण्यात आले. शिबिरात अनुक्रमे अन्न पुरवठा विभाग व प्रधानमंत्री/रमाई/शबरी/इंदिरा आवास योजना विभागाशी संबंधित सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले होते.

         कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून जि.प.समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, उपसभापती निरज उपवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.गोंदिया प्रभारी खंड विकास अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजन समिती गोंदियाचे सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प गोंदिया 01 नरेश सोनटक्के, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प गोंदिया 02 विशाल भोसले, तसेच ग्रापपंचायत दवनीवाडा सरपंच लक्ष्मी श्रीबांसरी, ग्रामपंचायत वळद सरपंच प्रिती सेलोटे उपस्थित होते.

         समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

       सदर शिबिरात तालुका स्तरावरील सर्व शासकीय विभागांच्या योजनांची माहिती तालुका स्तरावरील विभाग प्रमुखांकडून देण्यात आली. तसेच महिलांच्या विविध विभागांकडील समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

       सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजन समिती गोंदियाचे अध्यक्ष तथा तहसिलदार मानसी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प 01 नरेश सोनटक्के, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया 01 चे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) तिर्थराज उके, प्रकल्प गोंदिया 02 चे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) कुसुम सिरसाम, अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका जी.डी.पंधरे, शशीकला तावाडे, दयाबाई राऊत, सुनिता दमाहे, रमा बोरकर, गुलाब पारधी, लता उईके, सुकवंती सुलाखे, स्मिता राऊत, आराधना देशभ्रतार, परिचर कृष्णाबाई नागपुरे, अंगणवाडी सेविका कल्पना पटले, सुनिता पटले, रेखा रहांगडाले, शकुंतला गोंडाणे, लिलावती रहांगडाले, रेखा हरिणखेडे, संगीता बांते, लता धुवाधपारे, पुष्पा दोनोडे, उषा दाऊदसरे, कौशल्या हरिणखेडे, भागवंता पटले, सुशिला हरिणखेडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Exit mobile version