नक्षल्यांच्या भ्रमणमार्गावरील पिपरखारीत सशस्त्र दुरक्षेत्र पोलीस चौकी

0
36
गोंदिया(खेमेंद्र कटरे)-गेल्या तीन चार दशकापासून नक्षल्यांच्या हालचालीमुळे जिल्ह्याला नक्षलवादाचा फटका सहन करावा लागत आहे.त्यामुळे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेशी संवाद साधत सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस चौक्या(एओपी)उभारल्या जात आहेत.गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात आत्तापर्यंत 10 आर्म्ड आऊट पोस्ट उभारण्यात आल्या असून 11 वी आऊट ही गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर पिपरखारी येथे उभारण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे शेजारील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील म्हसेली,आगरी परिसरात जो लोहप्रकल्प उभारला जाणार आहे.त्या प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा ही एओपी महत्वाची ठरणार आहे.सध्या जल जंगल जमीनच्या नावावर त्या लोहखनिज प्रकल्पाला विरोध होत असला तरी प्रकल्प सुरु झाल्यानंतर जिल्हा सिमेवर पिपरखारी एओपी सुरक्षेकरीता महत्वाची भूमिका बजावणार असल्यानेच या ठिकाणी ही एओपी तयार करण्यामागचा पोलीस प्रशासनाचा उद्देश आहे.
 नक्षलग्रस्त भाग असलेला पिपरखारीचा जंगलपरिसर जो ढास पहाडाला लागून आहे,त्याभागातून नक्षल्यांची गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात एंट्री व्हायची.त्या भागातच पोलिसांनी आऊट पोस्ट उभारण्यास सुरवात केले आहे.2020 मध्येच मंजुरी मिळालेल्या या पोलीस चौकीच्या कामाला 30 जानेवारी 2023 रोजी सुरवात करण्यात आली.खासगी जमीन संपादित करुन सी60,बीएसफ,आयआरबी व पोलीस उपमुख्यालयाच्या जवांनानी एकत्र येत 16 हजार सिमेंट बँग तयार करुन या पोलीस चौकीच्या बांधकामाकरीता सुरक्षा भिंत तयार केली होती.3 एकर जागेवर ही सशस्त्र दूरक्षेत्राचे काम होत असून 1990-91च्या काळात नक्षल्यांच्या कारवायाचे शिकार झालेल्या इसमाने ही जागा उपलब्ध करुन दिली आहे.
पिपरखारी गटग्रामपंचायत असलेले गाव हे बीचटोला,इंदिरानगर,मडावीटोला,पुरामटोला व गौराटाला असे मिळून तयार झाले आहे.येथील बीचटोला येथे ही सशस्त्र चौकी उभारण्यास सुरवात झाली आहे.190 घरांची वस्ती असलेल्या या गावची लोकसंख्या 2150 च्या जवळपास आहे.पिपरखारी पोलीस चौकीपासून गडचिरोली जिल्ह्याची सीमा हा 10 किमी असून कोरची पोलीस चौकी 16 किमीवर आहे.
या सशस्त्र दुरक्षेत्राला लागून जंगल भाग आहे.
पुर्व भागाला-तवागड,एडमागोंदिचे जंगल
पश्चिम भागाला-मलकाझरी,प्राणपूरचे जंगल
दक्षिण भागाला-पडियालजोब,मुरकुटी जंगलपरिसर
उत्तरभागाला-ढासगड जंगलपरिसर

नक्षल मुवमेंट व्हायचा या जागेवरून  नक्षल्यांचा भ्रमणमार्ग- गडचिरोली बार्डर

कोरची भागातून नागनडोह, मयालगट, ढासगड, रेहांडीफोटा,चिपोटा, मेहताखेडा,हलदीफुटाना, जोब, सिरपूरडँम, इळुकचुवा, शिवमंदिरपहाडी, गल्लाटोला मार्गे बोरतलाव या मार्गाने कान्हाकडे जाण्याचा नक्षल्यांचा मार्ग आहे.या पोलीस चौकीमुळे या मार्गावर आता नक्षल्यांना आळा बसणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस चौकी
बोंडे, मगरडोह, पिपरखारी, गणूटोला, बिजेपार, दरेकसा, मुरकुटडोह, पिपरीया,धाबेपवनी, गोठणगाव व  केशोरी
नक्षल भरतीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील युवकांचा समावेश नाही-अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर
नक्षल्यांची चळवळ दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली असून गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक हा पोलीस व प्रशासनासोबत एकत्र येत स्वयंरोजगारासह नोकरीकडे वळल्याने नक्षलभरतीमध्ये गेलेला नाही.मात्र नक्षल्यामध्ये सध्या छत्तीसगडमधील बस्तर भागातील व गडचिरोली जिल्ह्यातील काही युवकांचा समावेश होत आहे.आधी या गावाकडे पोलीस फिरायचे तेव्हा गावकरी दूूरुनच दार बंद करायचे मात्र जेव्हापासून दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून यांची कामे करुन दिली जाऊ लागले तेव्हापासून आता मिळून मिसळून राहत असून सध्या याठिकाणी नवनिर्मित बांधकाम सुरु असतानाच काही सणत्योहार आले तर एकमेकासोबंत मिठाई वाटप करुन स्नेहबंध जोपासले जात असल्याचे सांगितले.