रवींद्र फुलबांधे यांचे निधन

0
20

पवनी ः भोजापूर येथील रहिवासी रवींद्र दुधराम फुलबांधे (वय ४९) यांचे सोमवारी (ता. २९) सकाळी ८.५७ वाजता नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. पवनी पंचायत समितीचे माजी उपसभापती दुधराम फुलबांधे यांचे कनिष्ठ चिरंजीव होते.