कालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.29ःजिल्ह्यात मोठ्याप्रमाणात महसुल व खनिकर्म विभागाच्या आंधळ्या भुमिकेमुळे शासकीय जागेसह खासगी जागेवरुन गौणखनिजाचे अवैधरित्या उत्खननाचे प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात सर्वाधिक प्रमाण असल्याचे एका पाहणीत आढळून आले.रेल्वेच्या तिसर्या रेल्वेमार्गाकरीता एका खासगी कपंनीने तर चक्क 40-50 फुट खोलखड्डे तयार करुन तेथील मुरुमाचे उत्खनन केले.तर गोंदिया तालुक्यातीलच बटाणा,बरबसपुरा,आसोली,टेमणी,गोंडीटोला परिसरातील खासगी जागेतही मोठ्याप्रमाणात गोंदियातील एका टिप्पर व्यवसायिकाने खोदकाम करुन मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन केल्याचे समोर आले आहे.त्याचप्रमाण याच मार्गावर असलेल्या कालव्याला लागून असलेल्या जमिनीवरील भिसारीमातीचे मोठ्याप्रमाणात खोदकाम करुन तिचेही वाहतूक करण्यात आल्याचे दिसून आले.दरम्यान कालव्यानजीकच्य़ा शासकीय जागेवरुन भुसारीमातीचे खोदकाम कधी करण्यात आले व परवानगी देण्यात आली होती काय अशी विचारणा या भागाचे तलाठी दिनेश कुर्वे यांना विचारणा केल्यावर मात्र त्यांनी आपणास माहित नाही असे सांगत आपण तर दररोज त्या रस्ताने ये जा करतो अशी पुष्टीही जोळली.जर तलाठी कुर्वे हे त्या मार्गाने दररोज ये-जा करीत असताना कालव्यानजीकच्या जागेवरुन मातीचे खोदकाम करुन जागा समतल करेपर्यंत त्यांच्या नजरेत हे कसे आले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून उपविभागी अधिकारी व तहसिलदारांनी याप्रकरणी सखोल चौकशी करणे गरजेचे झाले आहे.