तंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो

0
14

31 मे तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त विशेष

तंबाखूची साथ ही आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट आहेगुटखा आणि तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतोहे आपण लहानपणापासून ऐकत आहोतगावातशहरातराज्यातदेशात आणि जगभरात याबद्दल जनजागृती केली जातेसिगारेटच्या पाकिटावर देखील कर्करोगाची भयानकता दर्शवणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असून त्याचेही काटेकोर पालन होतेमात्रतंबाखू खाण्याऱ्यांचे आणि सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण कमी होतांना दिसून येत नाहीया व्यसनामुळे नागरिक स्वतःहून कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देतांना दिसून येतातक्षणभराच्या नशेसाठी आणि तलफ भागवण्यासाठी तंबाखूसिगारेटच्या आहारी जाणाऱ्या मंडळींमुळे कुटुंबाचे किती नुकसान होतेही बाब आकलनापलीकडची आहे.

जगामध्ये दरवर्षी जवळपास 63 लाख लोकांचा मुत्यू हा तंबाखू सेवनाने होतोभारतात दररोज 2 हजार 500 व्यक्तींचा मृत्यू तंबाखूमुळे होतोजागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार सन 2030 पर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मुत्यू हा तंबाखू सेवनामुळे होण्याचे भाकीत केले आहेएक बिडी किंवा सिगारेट ओढल्यामुळे संबधित व्यक्तीचे आयुष्य हे साडेपाच मिनिटांनी कमी होतेहे सर्वेक्षणातुन वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहेत्यावर उपाय म्हणून भारत सरकारद्वारे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून संपूर्ण जगामध्ये 31 मे हा दिवस तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

         भारतात तंबाखू सेवनाने दरवर्षी दहा लाख लोकांना मुख कर्करोग होतोयातील एक तृतीयांश लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागतेयावर्षी तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला अन्नाची गरज आहेतंबाखूची नाही ही संकल्पना राबविण्याचे जाहीर केले आहे.

      तंबाखू सेवनाने शारीरिक दुष्परिणाम :- तंबाखू सेवनाने तोंडाची व केसांना दुर्गंधी येतेतंबाखूजन्य पदार्थ सेवनाने दात सडत जातातहिरड्यांना इजा होते व दात निकामी होऊन त्यांची मजबुती नष्ट होतेदातांवर चॉकलेटीपिवळे डाग पडतातवास घेण्याची क्षमता कमी होतेचेहऱ्यावर सुरकुत्या पडतातशरीरात अशक्तपणा येतोहाडे ठिसूळ होतात व रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊ लागतेडोळ्यांमध्ये जळजळ होतेतंबाखूमुळे तोंडस्वरयंत्रफुफ्फुसगळाअन्ननलिकामूत्राशयमुत्रपिंडनाकपोटगर्भाशय व मुखाचा कर्करोग होतोपुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत जातेज्या महिला तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यांची प्रजनन शक्ती कमी होते व स्त्रियांमध्ये वंधत्व निर्माण होते.

       तंबाखू सेवन थांबविण्याचे फायदे :- आरोग्य संपन्न जीवनशारीरिक क्षमतेत वाढआत्मविश्वासात वाढ होतेव्यसन व उपचारांवरील होणाऱ्या खर्चाची बचत होतेघरातील सदस्य आणि आजुबाजूच्या मित्र परिवारास पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतोआपले कुटुंब सुखी व आनंदी बनते तसेच पर्यावरण आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होते.

        तंबाखू सोडण्यासाठी उपाययोजना :- तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबियांसमोरनातलगासमोर किंवा मित्रांसमोर करातंबाखू सेवनास प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहाजेव्हा तंबाखू सेवनाची इच्छा होते तेव्हा 1 ते 100 अंक मोजणेप्राणायाम वैगेरे कृती कराचणेशेंगदाणेबडीशेप इत्यादी पदार्थाचे सेवन करावेतंबाखू सेवनामुळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसायने बाहेर टाकण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात रुग्णांना समुपदेशन करणेप्रत्येक महिन्याच्या पहिल्यातिसऱ्या व चौथ्या बुधवारला कर्करोग शिबिर आयोजित करण्यात येतेशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी व समुपदेशन करुन तंबाखू मुक्त शाळा केली जाते.

          31 मे 2023 रोजी तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे केटिएस सामान्य रुग्णालयामध्ये विविध कार्यक्रमाचे जसे- तंबाखू सेवनविरोधी जनजागृतीपर रॅली, जनजागृतीपर पथनाट्य, रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे व जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी केले आहे.

–         जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया