गोंदिया, दि.30 :- तहसील कार्यालय देवरी येथे “शासन आपल्या दारी” समाधान शिबीर आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या शिबिरात लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सोबतच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहेषराम कोरोटे होते.
सदर शिबिरात सर्व तालुक्यातील यंत्रणांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावले होते. आमदार सहेषराम कोरोटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते संदीप भाटिया, तहसिलदार अनिल पवार, जि.प.महिला व बालविकास समिती सभापती सविता पुराम, जि.प. सदस्या उषा शहारे, पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, जिल्हा परिषद सदस्य राधिका धरमगुडे, पंचायत समिती सदस्य भारती सलामे, प्रल्हाद सलामे, नगराध्यक्ष देवरी संजय उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा सांगिडवार, नगरसेविका सुनिता शाहू, सीता रंगारी, पंचायत समिती सदस्य शामकला गावड व वैशाली पंधरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास तहसील कार्यालय देवरी येथील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला आणि देवरी तालुक्यातुन आलेल्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.