गोरेगाव :-तालुक्यातील ग्राम पंचायत गणखैराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या होतकरू महिलां कडून महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्राम पंचायती मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले. ग्राम पंचायत स्तरीय समिती ने आलेल्या अर्जांची छाननी करून वर्षा जनबंधु आणि आरती चवारे यांची निवड करून जयंती दिनी शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह तसेच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.ग्राम पंचायत सभागृहात आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष आदमने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अनुराज सरोजकर, ग्राम पंचायत सदस्य पुष्पराज जनबंधु, नंदकिशोर तुप्पट, हितेंद्र पारधी, गायत्री मोहबे, दमयंता सेंदुरकर, लता पटले,गीता गावराने, मुख्याध्यापक साखरे मैडम, तलाठी पंचबुद्धे मैडम, अंगणवाडी सेविका प्रतीमा पारधी, आदमने मैडम, प्रतीक्षा बनसोड मैडम, वंदना सरोजकर मैडम, आशा वर्कर शोभा जांभुळकर, प्रीया राऊत, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सदर जयंती सोहळा निमित्त सरपंच यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या.देवी अहिल्यादेवी होळकर आधुनिक भारताच्या सुरूवातीच्या काळात , अहिल्यादेवी होळकर यांनी मराठा साम्राज्याची वंशपरंपरागत महान राणी म्हणून काम केले. प्रमुख पाहुणे पुष्पराज जनबंधु यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनप्रवास सांगताना म्हटले की अहिल्यादेवी यांचा जन्म 31 मे इ.स.1725 रोजी महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी( मल्हारपीठ) खेड्यात झाला.त्यांनी आपल्या आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी ,तलाव ,कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते,पूल निर्माण केले आहेत. जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केलेे.सत्कार मुर्ती वर्षा जनबंधु आणि आरती चवारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक केवट सर आणि आभार उपरपंच अनुराज सरोजकर यांनी मानले.
© 2023, BerarTimes