
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )- तालुक्यातील नवेगाव बांध जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मौजा देवलगाव व मुंगली येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली देवलगाव येथे सरपंच सौ. दिपाली कापगते तर मुंगली येथे सरपंच कुशन नेवारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दोन्ही गावात शिलाफलक उभारून उद्घाटन करण्यात आले. वसुधा वंदन व पंचप्रण शपथ घेऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना नमन करण्यात आले. सोबत कलश व माती पूजन करून गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे आणि पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, पुष्पलता दृगकर, सरपंच सौ दिपाली कापगते, उपसरपंच तामदेव कापगते, बाजार समिती संचालक शारदा नाकाडे, ग्रामसेवक डी डी लंजे, सरपंच कुसन नेवारे, उपसरपंच गुणवंता वालदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरसकोल्हे .दोन्ही गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.