प्रायोगिक तत्त्वावर वीस एकर शेतीमध्ये हळद व अद्रक लागवड- अदानी फाउंडेशनचा पुढाकार

0
29

तिरोडा-अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा सेंद्रिय शेती बहुपीक लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील 22 शेतकऱ्यांची निवड करून एकूण 20 एकर शेतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेंद्रिय पद्धतीने हळद व अद्रक याची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश आपल्या परिसरातील शेतकरी फक्त भात पीक घेत आहेत. यामुळे शेतीची सुपीकता तसेच कस वाढण्यास अडथळा होत आहे. जर पीक बदलवित राहिले तर शेतीची सुपीकता वाढण्यास नक्कीच मदत होईल तसेच भात पिकाला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होत नाही. त्यामुळे पीक पॅटर्न बदलणे काळाची गरज आहे असे मत अदानी फाउंडेशन प्रमुख बीमुल पटेल यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांतर्गत अदानी फाउंडेशन तिरोडा मार्फत निवड केलेल्या बावीस शेतकऱ्यांना प्रति एकर रुपये तीस हजाराचे हळद व अद्रक बीज देण्यात आले. तसेच मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत आहे. सदर उपक्रम यशस्वी झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व जास्तीत जास्त शेतकरी या पिकाकडे वळतील असे कार्यक्रमाधिकारी कैलास रेवतकर यांनी सांगितले.