विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे आदर्श पालन करावे- उपेन्द्र कोठेकर

0
18

तिरोडा : तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागंडाले यांनी शिक्षक दिना निमित्त आयोजित केलेला सत्कार समारोहात सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक तसेच दहावी बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व विदर्भाचे भा.ज.पा. संघटक उपेन्द्र कोठेकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रांहागडाले, बांधकाम सभापती संजय टेभरे, माजी आ. आमदार भजनदास वैद्य, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, रमेश कुथे, भारतीय जनता पक्ष संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सोनू कुथे, महिला बालकल्याण सभापती सौ. सविता पुराम,सोनाली देशपांडे, कुंदाताई पटले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसभापती भुमेश्वर रहांगडाले, डॉ. वसंत भगत, भाऊराव कठाणे, जि प सदस्य माधुरी रहांगडाले, रजनी सोयाम कुंभरे, तुमेश्वरी बघेल, चतुर्भुज बिसेन, ओम कटरे, मदन पटले, मनोहर सोनवाने, रेखलाल पारधी, किशोर पारधी, संजय सिंग बैस, गिरधारी बघेले प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाचा आरंभ भारत माता व भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक तसेच दहावी बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे संचालन मदन पटले, प्रास्ताविक आमदार विजय रहांगडाले यांनी तर आभार प्रदर्शन स्वानंद पारधी यांनी केले.