अर्जुनी मोर. :-बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बदल होत असताना शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्र संकल्पना उदयास येत आहेत नवनवीन संकल्पनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सरल करतानाच सामाजिकतेचे भान ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन एस. चंद्रा महिला महाविद्यालय साकोली चे प्राचार्य डॉ. राजेश चांडक यांनी व्यक्त केले.
ते जयदुर्गा हायस्कूल एवं जुनिअर कॉलेज गौरनगर च्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना बोलत होते. विद्यालयातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्था सचिव डॉ. राजेश चांडक यांची एस. चंद्रा महिला महाविद्यालय साकोली येथे प्राचार्य पदावर नियुक्ती बद्दल तर संस्था सदस्य व एस. एस. जे. महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे कार्यरत प्राध्या. डॉ. पांडुरंग डांगे यांची विद्यापीठ व्यवस्थापन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना शाळेचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे यांनी सत्कार मूर्तीचे मार्गदर्शन व शाळेची असलेले स्नेहसंबंध विशद करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बोलतांना प्रा. शरद मेश्राम तसेच सहा. शिक्षक कांतीकुमार बोरकर यांनी सत्कार मूर्तींचे शैक्षणिक व सामाजिक योगदान विशद करून भूतकाळातील स्मृतींना उजाळा देवून सत्कारमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यावर प्रकाश टाकला.यावेळी सत्कारमूर्ती प्रा. डॉ पी.एस.डांगे यांनी सेवा काळात संपूर्ण समर्पण भाव ठेवून कार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संस्थेचे सचिव अशोक चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला संस्था सहसचिव मदन चांडक, केंद्रप्रमुख विलास काशिवार, प्राध्या. शरद मेश्राम, प्रा. शेखर राखणे, छगन फाये ,सरपंच विकास वैद्य, संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत गौरनगर चे सर्व सदस्य तसेच बहुसंख्येने पालक यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भूवेंद्र चव्हाण यांनी केले तर संगदीप कांबळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये नवीन संकल्पनांना सकारात्मक प्रतिसाद काळाची गरज- प्राचार्य डॉ. राजेश चांडक
वाढदिवसाच्या शुभेच्छा