सामाजिक कार्यकर्ता अश्विन सिंह गौतम यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील ७२ युवक व्यसनमुक्त

0
7

अर्जुनी मोर :- बदलते युग ,वाढती स्पर्धा, आणि नको त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाढते गुन्हेगारी यामुळे सामाजिक व कौटुंबिक वातावरण दूषित होतो. मग वयस्कर असो किंवा नवतरुण त्यात पुरुष असो की स्त्री सर्वच आपले ताण कमी करण्यासाठी जीव घेणे व्यसनाकडे वळतात. या सर्वांमध्ये तरुण वर्ग सर्वात जास्त व्यसनाधीन होत आहेत. चुकीची संगत आणि अज्ञानी पणाने नवतरुण पिढी दारू,सिगरेट, गांजा,तंबाखू, यापेक्षा समोर व्हाईटनर टयुब ,दुखणे कमी करणारे विविध औषधीचा वापर करून नशा करताना आढळतात.त्यामुळे अनेक युवक गंभीर आजाराने ग्रसीत होऊन आपले संपूर्ण आयुष्य संपवतो आणि कुटुंब उध्वस्त होतो. दारू सिगरेट तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचा वापर करून व्यसनाधीन झालेले जिल्ह्यातील विविध तालुक्यातील युवकांना व्यसनमुक्त करून नवजीवन देण्याचे कार्य अश्विनसिंह गौतम यांनी केले. अर्जुनी मोर ,सडक अर्जुनी, सालेकसा, देवरी, गोरेगाव, तिरोडा, क्षेत्रातील एकूण 72 युवकांना दत्तक घेऊन नागपूर स्थित महात्मा गांधी व्यसनमुक्त केंद्राच्या मदतीने त्यांना तब्बल तीन वर्ष वैद्यकीय तसेच मानसिक उपचार देऊन व्यसनमुक्त करण्यात यश प्राप्त झाले. घरचा तरुण व्यसनमुक्त होतो तेव्हा संपूर्ण कुटुंब स्थिर होतो. वादविवाद, हिंसाचाराचे प्रमाण कमी होतात.गरज असते ती मानसिक तयारीची व्यसनाधीन व्यक्तीस मानसिक सहकार्य केले तर नक्कीच परिवर्तन घडवून येतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशी गौतम यांनी केलेले प्रयत्न व्यसन मुक्त झालेले 72 युवकांना शैक्षणिक सहकार्य आणि रोजगार कसे मिळेल याकडे समोरील नियोजन असल्याचे गौतम यांनी सांगितले.