अर्जुनी मोर. 🙁 सुरेंद्रकुमार ठवरे ) तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरीने केलेल्या आव्हानाला साथ देत हद्दीतील २४ गावांनी एक गाव एक गणपती या संकल्पने प्रमाणे गणेश मूर्तीची स्थापना करून दिलेल्या वेळेत व शांततेत गणेशोत्सव साजरा केला.
ज्या गणेशोत्सव मंडळांनी केशोरी पोलीस स्टेशनने दिलेल्या निकषांची पुर्तता केलेली आहे त्या मंडळांना “सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार – 2023” आज दि.०६/१०/२०२३ रोजी निखील पिंगळे साहेब पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे शुभहस्ते पोलीस स्टेशन केशोरी येथे देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अशोक बनकर साहेब अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी व ईतर मान्यवर उपस्थीत होते.
विजेते गणेशोत्सव मंडळ (सर्वसाधारण गट) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केशोरी, बालगोपाल गणेशोत्सव मंडळ प्रतापगड,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोंडगाव/सूरबन, छत्रपती शिवाजी युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ चिचोली/जुनी,
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दिनकर नगर,विजेते गणेशोत्सव मंडळ (अतिदुर्गम गट) सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ भरनोली,नवयुवक गणेशोत्सव मंडळ कन्हाळगाव,नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ गंधारी,नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ जांभळी, श्री सिद्धिविनायक बाल गणेशोत्सव मंडळ अंभोरा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना अनुक्रमे पुरस्कृत करुन मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केशोरी पोलीस स्टेशन गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदारांचा देखील सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाची प्रस्तावना ठाणेदार सोमनाथ कदम, सूत्रसंचालन अनिल लाडे सर, आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांनी केले.