आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने ४ कोटी ८९ लक्ष रुपयांचा रस्ता मंजुर

0
11

गोरेगाव,दि.10- तालुक्यातील खाडिपार – बोरगाव – कवलेवाडा रस्ता मा आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असुन एकुण ७ कीमी लांबिच्या रस्त्याचे बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. एकुण ४ कोटी ८९ लक्ष रुपयांच्या निधी रस्ता बांधकामासाठी मंजुर करण्यात आलेला आहे. यात ५. ३८ किमी भाग डांबरी तर १. ७० किमी भाग सिमेंट कांक्रिटचा असणार आहे. पाण्याच्या निचरा व्यवस्थित व्हावा या उद्देशाने १४ मोरी बांधकाम तसेच ३ बॉक्स सेल ब्रिज चे निर्माण करण्यात येणार आहे. रस्त्याचे भूमिपूजन मा आमदार विजय रहांगडाले यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडले. यावेळी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार हेमंतभाऊ पटले, जि.प. सदस्य शैलेशजी नंदेश्वर, पवनभाऊ पटले, पं.स. उपसभापती राजकुमारजी यादव, विजूभाऊ राणे माजी पं.स. सभापती, पं.स. सदस्य सुप्रियाताई गणवीर, चित्रलेखाताई चौधरी, कृ.ऊ. बा.स. सभापती पिंटूभाऊ रहांगडाले, मनीषाताई चोपकर सरपंच बोरगाव, शकुंतलाताई कटरे सरपंच कवलेवाडा, दिनेशजी टेकाम सरपंच खाडीपार, यशवंतजी कावळे उपसरपंच खाडीपार तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.