मुरदोली घाटात एलपीजी टँकर उलटला, फायर टीम अलर्ट

0
12

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्याजवळ मोरदोली घाट हायवेला एलपीजीचा एक टँकर उलटला आहे व त्यामधून गॅस लिक होत आहे. देवरी फायरची टीम व संबंधित पोलीस विभाग घटनास्थळी पोहोचले आहेत. गोंदिया शोध बचाव पथक व फायर टीमला अलर्ट करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत रायपुर इंडियन ऑइल कंपनीची टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. व नागपूरची टेक्निकल टीम  स्पॉटला पोहोचत आहे. रायपूरच्या टिमसोबत कॉर्डिनेशन सुरू आहे. टँकरमध्ये हलक्या प्रकारचा लीक झालेला आहे.

आणि टँकर सरळ करण्याची कार्यवाही काही वेळात करण्यात येईल. त्या निमित्ताने दोन फायर टेंडर स्पॉटला असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सडक अर्जुनी येथील फायर टेंडर घटनास्थळी बोलविण्यात येईल. सध्या देवरी अग्निशमन विभागाचा एक फायर टेंडर घटनास्थळी उपलब्ध आहे.