बोंडगाव देवी सार्वजनिक गणेश मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

0
17

अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार 2023 अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथील सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळाला गोंदिया जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे, 12 ऑक्टोंबर 2023 ला रवींद्र नाट्यमंदिर मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये बोंडगाव देवी सार्वजनिक बाल गणेश मंडळाला पंचवीस हजार रुपये रोख व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 ही राज्य शासनाने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार योजना राबविली आहे .यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार पाच लक्ष रुपये, द्वितीय पुरस्कार 2 लक्ष 50 हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक एक लक्ष रुपये व प्रमाणपत्र तथा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 25 हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2023 मध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथील सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस सुद्धा प्राप्त केला आहे, 19 /9/ 2023 ते 28/ 9/ 2023 पर्यंत बोंडगाव देवी येथील सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळांनी दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले. तसेच दहा दिवस विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा राबविले. तसेच सहानगड व प्रतापगड किल्ल्यावर ग्राम स्वच्छता अभियान ही राबविले .त्यांच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेण्यात आली. व जिल्हास्तरीय पुरस्कारात गोंदिया जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार पंचवीस हजार रोख व प्रमाणपत्र पटकाविला. पुरस्कार मिळविण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रीतीकुमार वाढई, उपाध्यक्ष नाशिक बोरकर, कार्यवाहक कैलास घावळे, सहकार्यवाह रोहित मानकर, ज्ञानेश्वर मेश्राम, कोषाध्यक्ष नीलकंठ राऊत, राजेश झोडे, स्वागताध्यक्ष सरपंच प्रतिमा बोरकर, तथा कैलास मानकर, शांतीप्रकाश भैसारे, प्रकाश रामटेके, दिलीप बोरकर, आनंद बोरकर ,रवी बनपूरकर ,संजय गिरपुंजे, दिनेश परशुरामकर, डॉक्टर पुरुषोत्तम राऊत, हिरामण ठाकरे, संतोष मेश्राम, रेवाराम बरैया ,मनोज पालीवाल, देवा पुस्तोळे, योगेश बारस्कर, कपिल सुखदेवे, उमेश वालदे, सावंत रामटेके, गोवर्धन शेंद्रे व सर्व ग्राम पंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, सर्व समित्यांचे पदाधिकारी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण ग्रामवासी यांचे मोलाचे योगदान आहे.