येरंडी /देवलगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अविरोध होण्याचे संकेत ?

0
8

अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) अर्जुनी मोर. तालुक्यातील येरंडी/देवलगाव ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक तथा जवळीलच कुंभिटोला येथील एक सदस्य पदाची पोट निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन 5 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.मात्र येरंडी/देवलगाव ची ग्रामपंचायत निवडणुक अविरोध करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत असुन त्या संबधाने दोन्ही पॅनलमधे मिटींग घेण्याच्या सपाटा सध्या सुरु आहेत.अविरोध निवडणूक व्हावी या संबधाने येरंडी ग्रामवासिंयातर्फे प्रमुख पुढा-यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर येथे ता.15 ऑक्टोबर ला पार पडली असुन अविरोध निवडणूकी संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती मिळाली आहे. जर येरंडी ग्रामपंचायत ची निवडणूक अविरोध झाली तर तालुक्यात मोठा आदर्श होणार याकडे तालुकावाशीयांचे लक्ष लागले आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यातील येरंडी/ देवलगाव हे गाव राजकीय दृष्ट्या अति महत्वकांक्षी असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय जानकारासह विविध पक्षप्रमुखांचे सुद्धा लक्ष लागले राहते. तालुक्यातील येरंडी/ देवल. ग्रामपंचायत ची थेट सरपंच पदासह निवडणूक व कुंभीटोला / बाराभाटी ग्रामपंचायत च्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका अनुसूचित जमाती महिला राखीव पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे .अधिसूचना जाहीर होताच येरंडी गावात ग्रामपंचायत निवडणूक संबंधाने राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे यासाठी तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण गावकऱ्यासह परिसरातील गावातील लक्ष या निवडणुकी कडे लागले आहे. येरंडी/ देवल. ग्रामपंचायत ची थेट सरपंच पदासह नऊ सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसह कुंभिटोला ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोट निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या सोमवार दिनांक 16 पासून ते २० ऑक्टोबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत .प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी 23 रोजी, उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर, त्याच दिवशी दुपारी तीन वाजे नंतर चिन्हाचे वाटप,व 5 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून साडे पाच वाजेपर्यंत मतदान मतमोजणी व निकाल सहा नोव्हेंबरला लागणार आहे. येरंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड ही थेट गावातील मतदारांमधून होणार आहे तसेच नऊ ग्रामपंचायत सदस्यांची निवड तीन प्रभागातून होणार आहे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पाच महिला तर चार पुरुष अशा प्रमाणात सदस्य संख्या राहणार आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये 446 मतदार, प्रभाग क्रमांक दोन मध्ये 446, मतदार प्रभाग क्रमांक तीन मध्ये 282 मतदार असे 1174 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. निवडणूक यंत्रणा सज्ज येरंडी /देवल ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच कुंभिटोला येथील एका जागेची पोट निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक यंत्रणा सज्ज आहे .निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिरुद्ध कांबळे ,निवडणूक नायब तहसीलदार गणेश सोनवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी आर. एच .उपरीकर तसेच सहाय्यक निर्णय अधिकारी एफ. बी. बावनकर काम पाहणार आहेत.