मुल्ला येथे फ्रीजचा स्फोटःप्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला

0
19

देवरी, दि.१७ – येथून उत्तरेला ११ किलोमीटर अंतरावरील मुल्ला येथे आज सायंकाळी ५च्या सुमारास स्वयंपाक घरात असलेल्या फ्रीजचा स्फोट होऊन घरालाआग लागली. सरपंचासह गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर असे की, मुल्ला येथील माजी पोलिस पाटील तेजरामजी वैद्य यांच्या स्वयंपाक घरात असलेल्या फ्रीजमधील कॉम्प्रेशरच्या टाकीचा स्फोट होऊन फ्रीजने पेट घेतला. यामुळे स्वयंपाक घराला आग लागली. हा प्रकार गावकऱ्यांच्या आणि सरपंच कल्पना बागडे यांंचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मुकुंद बागडे यांच्या लक्षात आला. श्री बागडे आणि गावकरी मदतीला धावले आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच घरातील वीजप्रवाह बंद करून आग आटोक्यात आणली. स्वयंपाक घरातील साहित्य जळाल्याने फ्रीजसह किरकोळ साहित्य या आगीत जळाले. उल्लेखनीय म्हणजे यावेळी घरातील प्रमुखासह पुरुष मंजळी घरी उपस्थित नव्हते.