गोंदिया,दि.18 – तालुक्यातील श्री सारथी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ग्रामपंचायत कटंगी(कला) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव श्रीमती ममता रमेशकुमार राणे,सरपंच मोहीनीताई वर्हाडे,पंचायत समिती सदस्य विनोद बिसेन,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु वर्हाडे,पोलीस पाटील उमेश बावनकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती नेवारे,संतोष दमाहे,श्रीमती ठाकरे,भूमिता बघेले,श्री.भुरे,महेंद्र नेवारे,श्रीमती फुले आदी उपस्थित होते.