चार दिवसात नगरपंचायत पाणीपुरवठा सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करु राष्ट्रवादी काँग्रेस

0
12

अर्जुनी मोर. :–मागील ऑगस्ट महिन्याच्या 24 तारखेपासून अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत पुरवठा केल्या जाणारा पिण्याच्या स्वच्छ पाणी अर्जुनी मोरगाव नगरपंचायतला बंद आहे.नगरपंचायतकडे जिल्हा परिषदेचे 27 लक्ष रुपये थकीत असल्यामुळे सदर पाणीपुरवठा बंद करण्यात आला,अशी माहिती प्राप्त आहे.ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठा करत असताना जिल्हा परिषद नगरपंचायतीलाही पाणीपुरवठा करतो त्यामध्ये प्रत्येक महिन्याला नगरपंचायतीकडून जिल्हा परिषदला पाण्याचे पैसे घेणे असते हे बिल एकूण सत्तावीस लाख रुपये झाल्याची माहिती जिल्हा परिषदेला न भरल्यामुळे जिल्हा परिषदेकडून नगरपंचायतला पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.नगरपंचायत परिसरातील अत्यंत गरीब व गरजू लोकांना नळाच्या पाण्याशिवाय काही पर्याय नसतो श्रीमंत लोक हे स्वतः पाण्याची व्यवस्था करू शकतात.परंतु सामान्य नागरिक हे करू शकत नाही,तो संपूर्ण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून होता परंतु मागील आगस्ट महिन्याच्या 24 तारखेला बंद झालेला पाणी अजून पर्यंत सुरू झालेला नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जांभुळकर यांच्याकडे मागणी केली.राजेंद्र जांभुळकर यांनी चार दिवसात पाणीपुरवठा सुरू करा अन्यथा नगरपंचायत कार्यालयावर घागर आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन नगरपंचायतला दिले.येणाऱ्या चार दिवसात नगरपंचायत पाणी शोध करतो किंवा नाही व न केल्यास आंदोलनाचे तीव्र रूप बघायला मिळेल याकडे तालुक्यातील सर्व लोकांचे लक्ष लागलेले आहे.निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.के.जांभुळकर, नगरसेवक दानेश साखरे,शालिकराम हातझाडे, नाशिक शहारे, त्रिशरण शहारे, दिवाकर शहारे,महमुद शैय्यद,गौरव जांभुळकर, रोशन सांगोळे,व ईतर नळधारक उपस्थित होते.