देवरी येथे शरद पौर्णिमा निमित्त मोफत औषध वितरण शनिवारी

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

शरद पौर्णिमा निमित्ताने दमा या आजार वर मोफत औषध उपचार

देवरी,दि.25- स्थानिक माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदीर देवरी येथील सभागृहात दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोज शनिवार ला सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पौर्णिमा चे औचित्य साधून दमा,जुनाट सर्दी,खोकला इत्यादी लक्षण असलेल्या रुग्णांकरिता या आजारावर उपाययोजना म्हणून मोफत औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार आणि सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुनील समरीत यांनि केले आहे.