विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा महाजन आक्रोश मोर्चा

0
7

भंडारा :- शासनाने सुरू केलेले कंत्राटीकरण, खाजगीकरण, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात व जुनी पेन्शन, जातीनिहाय जनगणना, सरसकट शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी भंडारा येथे ४० संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण, शाळा, नोकरी व पेन्शन बचाव संघर्ष कृती समिती भंडाराच्या वतीने शिक्षण शाळा, नोकरी आणि जुन्या पेन्शनसाठी महा जनआक्रोश आंदोलन केले.मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था चालक, शेतकरी, कंत्राटी कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका व विविध विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था चालक, शेतकरी, कंत्राटी कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका व विविध विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भंडारा शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात शिवाजी स्टेडियम येथून करण्यात आली.

गांधी चौक, महाल मार्गे मुस्लिम लायब्ररी चौक व जे. एम पटेल कॉलेज रोड मार्गे त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक संघटनेचे आल्हाद भांडारकर, हेमंत बांडेबूचे, मुख्याध्यापक संघटनेचे राजकुमार बालपान्डे, राजू बांते, शिक्षक भारतीचे उमेश सिंगनजुडे,ओबीसी युवा अधिकार मंंचचे उमेश कोर्राम, विनोद किंदर्ले, प्रवीण गजभिये यांनी केले. विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा सरकारला देण्यात आला. या मोर्च्यात जिल्ह्यातील ४० संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात प्रामुख्याने रामभाऊ येवले, सुनील मदारकर, सैनपाल वासनिक, गंगाधर भदाडे, फारूक शहा, प्रवीण हिंगणघाटे, पवन वंजारी, विनीत देशपांडे, दीपक जनबंधू, आर. के. भालेराव, रवींद्र भांडारकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, योगेश शेंडे, प्रमोद केसरकर, महेश वाहने, डॉ. शैलेश कुकडे, डॉ. विशाल वासननिक, डॉ. अमित जवंजार, डॉ. तुषार मस्के, रमेश सिंगनजुडे, अंगेश बेलपांडे, राजू बारई, मार्तंड गायधनी, सैग कोहपरे, अशोक गायधनी, मुबारक सय्यद, दारासिंग चव्हाण, रुपेश नागलवाडे, विलास खोब्रागडे, प्रीतम शहारे, प्रमोद बालपांडे, सुधाकर देशमुख, धीरज बांते, श्याम पंचवटे उपस्थित होते