अर्जुनी/मोर-ढिवर समाज हा अतिशय दारिद्रयात जिवन जगत आहे. या समाजाची अतिशय दयनदिन अवस्था आहे. राजकीय आरक्षण नसल्याने समाजाचे लोक प्रतिनिधी नाही, या समाजाला प्रगतीच्या वाटेवर जायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटक मुले, स्त्री, पुरुष, यांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण घेतल्या नंतर ते शासकीय योजनाचा लाभ घेतील, शिक्षण घेतल्या नंतर शास्त्रीय पद्धतीने मत्स्यपालन व मासेमारी करतील नोकऱ्याचे समाजात प्रमाण वाढेल एकंदरीत संपूर्ण समाजाची आर्थिक प्रगती होईल, म्हणुन ढिवर समाजाने शैक्षणिक प्रगती करुनच आर्थिक प्रगती करावी असे उद्गार उद्घाटनीय भाषणातून आमदार मनोहर चंदिकापुरे यानी केले.
२८.आक्टोंबर शनिवारला नवेगावबांध येथे महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त समाज बांधवाचा मेळावा व आमदार चद्रिकापुरे यांच्या निधीतून रु.१० लक्ष चे समाज भवन बांधकाम कामाचे भूमिपुजन सोहळ्याचे आयोजीत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अध्यक्ष संजय केवट संचालक मत्स्यजीव संघ दिल्ली तर प्रमुख मार्गदर्शक,जनार्धन नागपुरे के.एन.नान्हे, उमराव मांढरे संयोजक संघर्ष वाहिनी गोंदिया, राजु वलथरे सेवानिवृत्त खंडविकास अधिकारी, किशोर तरोणे माजी जि.प. सदस्य लोकपालजी गहाणे तालुका अध्यक्ष रा.का.अर्जुनी/मोर विजय पचारे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी नागपुर, कांबळेताई चंद्रपुर, हेमराज पुस्तोडे उपसभापती, नितीनजी पुगलिया उद्योगपती, नंदुजी कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न झाला. कार्यक्रमात संपूर्ण गावात प्रभातफेरी,लेझीम,रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा नृत्य तसेच १० वी व १२वी मध्ये गुणवंत विद्यार्थाचे सत्कार कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय चाचेरे तर आभार केशव कोल्हे कार्यक्रम यशस्विते साठी संजय भुमके, शामराव कोल्हे, भिमराव मेश्राम श्रावण कोल्हे, सुशांत भुमके, शेषराव भुमके,शालु गोंधळे, भरत कांबळे, देवाजी मेश्राम, मयुर अहिरकर, यांनी केले कार्यक्रमाला संपुर्ण नवेगाबांध व अर्जुनी/मोर तालुक्यातील ढिवर समाज बांधव मोठ्या उपस्थित होते.