बाकटी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामचे भूमिपूजन

0
7

अर्जुनी मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे) तालुक्यातील नवेगाव/ बांध जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या बाकटी / चान्ना येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचना गाहाणे यांचे हस्ते ( ता. 29 ) करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाकटी च्या सरपंच सरिता राजगिरे होत्या, यावेळी पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर, उपसरपंच गुलशन सांगोळे, ग्रामपंचायत सदस्य करणकुमार मेश्राम, मेघराज उके ,नरेश दिघोरे, वैशाली सांगोडे, दिपाली सांगोडे ,नमिता भोयर, शालुबाई मेश्राम, पूजा बडोले, ज्येष्ठ नेते आनंदराव राजगिरे, व्यंकट खोब्रागडे ,गोपी राजगिरे, विनोद नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. मौजा बाकटी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता व 15 व्या वित्त आयोगातून नाली बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना रचना गहाणे म्हणाल्या की गावात स्वच्छता व सुख समृद्धी नांदण्यासाठी गावातील रस्ते व सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या स्वच्छ असल्या तर गावात आरोग्य संपदा नांदते. व दळणवळणासाठी नागरिकांची सोय सुद्धा होते. बाकटी गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी असल्याने निधी उपलब्ध करून देऊ व उर्वरित विकासही झपाट्याने करू असे आश्वासन दिले.