गोंदिया.-महामानव क्रांतिवीर धरतीआबा, जननायक भगवान बिरसा मुंडाजी यांच्या जयंती निमित्त गाव चुटिया येथे महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समितीच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी काँग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक (गप्पू) गुप्ता उपस्थित होते.या प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडाजी यांची यांना वंदन करत आदरांजली दिली व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच भगवान बिरसा मुंडाजी यांनी केलेला विक्रम लोकांसमोर ठेवला आणि थोडक्यात सांगितले की, ब्रिटिश राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्यासाठी लढणारे लोकनेते बिरसामुंडाजी होते, ज्यांनी तरुण वयात आदिवासी समाजाच्या आणि भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ब्रिटीश राजवटीपासून ते निसर्गाचे उपासक होते आणि त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करण्याचे काम केले होते, असे प्रतिपादन काँग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक (गप्पू) गुप्ता यांनी चुटिया येथे आयोजित कार्यक्रमात केले.दरम्यान, निलम हलमारे, मोहन गौतम, सरपंच कैलास गजभिये, ग्रामपंचायत अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.